Cost Of Gold And Diamond's Rakhis In gold market
Raksha Bandhan 2019 : रक्षाबंधनांमुळे उजाळला सुवर्ण बाजार; या राख्यांची किंमत ऐकून फुटेल घाम! By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 03:22 PM2019-08-14T15:22:11+5:302019-08-14T15:25:56+5:30Join usJoin usNext रक्षाबंधनाच्या सणामुळे सोने आणि हिऱ्याच्या राख्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्री बुकींग करुन लोकं राखी खरेदी करत आहेत. चांदीच्या राखीची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. लखनऊ, अमीनाबाद, आलमबाग, भूतनाथ मार्केट, गोमतीनगर याठिकाणी सराफ बाजार ग्राहकांनी उजळून निघाला आहे. सराफ व्यापारी सिद्धार्थ जैन यांनी सांगितल्यानुसार सोन्याची राखी 8 हजारांपासून अडीच लाखांपर्यंत किंमत आहे. ग्राहकांच्या मागणीनुसारही राख्या बनविल्या जात आहेत. व्यापारी अजय अग्रवाल यांनी सांगितले की, सोन्याची राखी खरेदी केली जात आहे मात्र महागाईमुळे बराचसा फटका बसला आहे. कमी वजनाच्या राख्या खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. सोन्याऐवजी चांदीच्या राखीला मोठी मागणी आहे. ऊँ या आकाराची राखी बाजारात मोठ्या प्रमाणात चालते. सोन्यापासून बनविलेल्या या राखीचं वजन 1.550 ग्रॅम असून त्याची किंमत 6 हजार 230 रुपये आहे. तसेच जास्तीत जास्त 8 हजार ते 10 हजारांपर्यंत या राख्या उपलब्ध होत आहेत. सराफ व्यापारी आदिश कुमार यांनी सांगितले की, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा रक्षाबंधनाच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी कमी आहे. शोरुममध्ये 2.35 लाख रुपयांची हिऱ्याने सजवलेली राखी आहे. तर सोने आणि हिरे मिळून बनविलेली राखी 1.56 लाख रुपयांपर्यंत आहे. टॅग्स :रक्षाबंधनRaksha Bandhan