every new mother make these 5 common mistakes in the first years
चिमुकल्यांची काळजी घेताना 'या' चुका नक्की टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 03:54 PM2019-10-31T15:54:54+5:302019-10-31T16:02:45+5:30Join usJoin usNext लहान मुलांची त्वचा ही अत्यंत नाजूक असल्याने त्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र अनेकदा पहिलंच मूल असल्याने आई-वडिलांना अनेक गोष्टी माहीत नसतात. चिमुकल्यांची काळजी घेताना कोणत्या चुका टाळायच्या हे जाणून घ्या. स्वत: ची काळजी न घेणं मुलांची काळजी घेण्यात काही पालक इतके व्यस्त असतात की त्यांना स्वत: ची काळजी घ्यायला वेळ नसतो. ते स्वत: च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र असं करू नका. बाळाबरोबरच स्वत: ची काळजी नक्की घ्या. जास्त प्रोटेक्टिव्ह होणं मुलांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जाणं महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा काही पालक हे आपल्या बाळाबाबत खूपच जास्त प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळेच ते मुलांना इतर व्यक्तींकडे देत नाहीत. मात्र असं करू नका मुलांची सर्वच लोकांशी ओळख करून द्या. लगेच घाबरणं मुलाला उलटी झाली किंवा खोकला आला तर काही पालक लगेच प्रचंड घाबरतात. घाबरण्याऐवजी मुलांना डॉक्टरांकडे घेऊन जा आणि त्यांच्या योग्य सल्ला घ्या. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपणं मुलं मोठी होताना त्यांच्या सर्व गोष्टी लक्षात राहाव्यात म्हणून त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपल्या जातात. हल्ली पालक सर्व गोष्टींचे फोटो काढण्यात व्यस्त असतात. मात्र फोटो काढण्यासोबतच मुलांसोबतचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका मुलांची काळजी घेताना पालकांना खूप सल्ला देत असतात. तसेच वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतात. मात्र कोणत्याही गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका. बाळासंबंधीत एखादी गोष्ट असल्यास डॉक्टरांचा तसेच घरातील मोठ्या मंडळींचा सल्ला घ्या. टॅग्स :पालकत्वParenting Tips