मुलांना पहिल्यांदा ब्रश करायला शिकवताय?; मग 'या' गोष्टींची काळजी घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 15:40 IST2019-07-18T14:55:14+5:302019-07-18T15:40:41+5:30

लहान मुलांची नीट काळजी घेणं गरजेचं असतं. मुलांना दात आल्यानंतर त्यांना दात घासण्याची सवय लावावी लागते. मुलांना पहिल्यांदा ब्रश करायला शिकवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

लहान मुलांसोबत पालकांनी ही ब्रश करावा. तसेच ब्रश करणं ही एक चांगली सवय असल्याचं मुलांना समजावून सांगा.

बाजारात आकर्षक रंगीबेरंगी ब्रश उपलब्ध आहेत. त्यामुळे सुरुवातीला मुलांसाठी असाच एक ब्रश घ्या म्हणजे मुलांना दात घासताना मजा येईल.

मुलांसाठी ब्रशची खरेदी करताना तो ब्रश सॉफ्ट आहे का हे नीट तपासून पाहा. मुलांच्या दाताला इजा होईल असा ब्रश निवडू नका.

मुलांना सुरुवातीला आरशासमोर उभं राहून ब्रश करायला शिकवा. जेणेकरून त्यांना ते कसे ब्रश करत आहेत हे दिसेल. एखादं छानसं म्युझिक देखील लावा.

तीन महिन्यांनंतर मुलांचा ब्रश बदला. त्यांच्यासाठी नवीन ब्रशची खरेदी करा.

मुलांसाठी बाजारात काही खास टूथपेस्ट उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा. कारण त्या टूथपेस्ट फ्लोराईडमुक्त असतात.

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना दोन वेळा मुलांना ब्रश करायची सवय लावा.