Holi 2019 tips for take care of children in holi
Holi 2019 : होळीच्या रंगात रंगताना मुलांच्या सुरक्षेकडे असं द्या लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 03:12 PM2019-03-20T15:12:15+5:302019-03-20T16:05:48+5:30Join usJoin usNext होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सहोलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. मात्र होळीच्या रंगात रंगताना मुलांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. होळी खेळताना विविध रंग वापरले जातात. मात्र बाजारात मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त रंग उपलब्ध आहेत. लहान मुलांना केमिकलयुक्त रंगांपासून दूर ठेवा. अशा रंगांमुळे मुलांना त्वचेसंबंधी काही आजार होण्याची शक्यता अधिक असते. सध्या इको-फ्रेंडली रंग देखील बाजारात मिळतात. मुलांना होळीसाठी असे रंग खेळायला द्या. होळी खेळण्यासाठी जाण्याआधी मुलांच्या अंगाला मॉयश्चराइजर क्रीम नक्की लावा. जेणे करून रंगामुळे त्यांच्या शरिराला त्यापासून काही इजा होणार नाही. तसेच त्यांना खेळताना स्वत: ची काळजी कशी घ्यायची याचा सल्ला द्या. होळी खेळताना मुलांना रंगाचं भान नसतं. तसेच पाण्यामध्ये खेळायला मुलांना प्रचंड आवडत असल्याने ते पिचकारीच्या मदतीने पाण्यात भिजण्याचा आनंद घेतात. त्यामुळे मुलं होळी खेळत असताना मुलांच्या जवळच राहा. त्याच्याकडे लक्ष ठेवा. लहान मुलांना फुगे आवडतात. अनेक ठिकाणी फुग्यांमध्ये रंगीत पाणी टाकून होळी खेळली जाते. मात्र मुलांच्या हातात असे फुगे देणं टाळा. कारण यामुळे त्यांना दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. काही ठिकाणी होळी खेळताना मस्तीमध्ये एकमेकांच्या अंगावर अंडी फोडली जातात, माती टाकली जाते. तर भिजवण्यासाठी खराब पाण्याचा वापर केला जातो. मात्र मुलांना अशा गोष्टी करण्यापासून रोखा कारण त्यांना यापासून इंफेक्शन होऊ शकते. होळी खेळताना लहान मुलांच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. एकमेकांना पाण्याने भिजवलं जातं. रंग टाकले जातात. पण कधी कधी यामुळे भांडण ही होतात. त्यामुळे मुलांना सगळ्यांसोबत मिळूनमिसळून सुरक्षित होळी खेळण्याचा सल्ला दिला जातो. टॅग्स :होळीHoli