दीर्घकाळ नातं टिकवायचंय? मग असं व्यक्त करा तुमचं प्रेम By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 07:04 PM 2019-04-02T19:04:48+5:30 2019-04-02T19:09:15+5:30
कोणतंही नातं फार नाजुक असतं. जर तुम्ही कोणतीही चुक केली तर त्याचा प्रभाव तुमच्या नात्यावर होऊ शकतो. खरं तर नातं टिकवण्यासाठी प्रेम आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. अनेकांचं तर असं म्हणणं असतं की, नातं विश्वासाच्या जोरावर टिकतं. जर तुम्ही नकळत तुमच्या पार्टनरच्या भावनांना ठेच पोहोचवली तर त्यांचा तुमच्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. दे हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार, तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा पार्टनकडून माफी मागण्यासाठी तुम्हाला त्यांना महागडे गिफ्ट देण्याची गरज नाही. काही छोट्या-छोट्या गोष्टींमार्फतही तुम्ही त्यांना खुश करू शकता.
विश्वास वाढवा नातं मजबूत करण्यासाठी एकमेकांवर विश्वास ठेवा. प्रेम व्यक्त करणं नात्यामध्ये अत्यंत आवश्यक ठरतं. हे फक्त तुमचं नातं मजबुत करण्यासाठी नाही तर तुमच्यातील प्रेम वाढविण्यासाठीही मदत करतं. यामुळे तुमच्यामधील दुरावाही कमी होण्यास मदत होते.
चिंता दूर करा प्रेम व्यक्त केल्याने पार्टनरच्या चिंता दूर होतात. त्यांना या गोष्टीची खात्री होते की, तुम्ही फक्त त्यांचेच आहात आणि तुमच्यापासून दूर होण्याची चिंताही त्यांना सतावत नाही. त्यांच्या मनातील सर्व शंका दूर होण्यासोबतच तुमच्यासाठीचं प्रेम आणि आदर वाढतो.
प्रेम वाढतं प्रेम व्यक्त केल्याने विश्वासासोबतच तुमचं नातं आणखी घट्ट होतं. तसेच तुम्हाला एकमेकांबाबत आदार वाटतो. एवढचं नाही तर तुमच्यातील प्रमेही वाढतं.
गैरसमज दूर करा कोणत्याही नात्यामध्ये गैरसमज असेल तर तो नात्यामध्ये एखाद्या भिंतीप्रमाणे उभा राहतो. कारण हा फक्त नातं तोडत नाही तर माणसालाही तोडतो. त्यामुळे तुम्ही पार्टनरच्या मनात तुमच्याबाबत कोणताही गैरसमज ठेवू देऊ नका.
एकमेकांना समजुन घ्या प्रेम व्यक्त केल्याने एकमेकांबाबत अनेक गोष्टी समजतात. यामुळे कोणत्याही गोष्टीमध्ये एकमेकांना समजुन घेणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे नेहमी पार्टनरप्रति असलेलं तुमचं प्रेम व्यक्त करा.