Kiss Day Different Types of Kisses and What They Actually Mean
Kiss Day : किस डे स्पेशल करायचाय?, मग वेगवेगळे प्रकार आणि अर्थ जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 03:11 PM2020-02-13T15:11:28+5:302020-02-13T15:19:21+5:30Join usJoin usNext आज व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस म्हणजेच किस डे आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला किस करून त्यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त केलं जातं. किस केवळ गर्लफ्रेंडलाच केलं जातं किंवा करावं असं नाही. आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी यांनाही किस करून भावना व्यक्त करता येतात. किस आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्याचं एक उत्तम माध्यम मानलं जातं. किस सगळेच करतात कोणी गालावर तर कोणी ओठांवर. पण किसचे वेगवेगळे प्रकारही आहेत हे फार कमी लोकांना माहीत आहे. आज Kiss Day च्या निमित्ताने किसचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ जाणून घेऊया.फोरहेड किस ओठांऐवजी फोरहेड म्हणजेच कपाळावरही किस करून भावना व्यक्त करू शकता. अनेक जण स्टार्टर म्हणून फोरहेड किस करतात. मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक असल्यास असं किस केलं जातं. हँड किस प्रपोझ करताना हँड किस हमखास केलं जातं. एकमेकांप्रती आदर दर्शविण्यासाठी हातावर किस केलं जातं त्याला हँड किस म्हणतात. चिक किस गालांवर केला जाणारा किस म्हणजे चिक किस. हा किस मैत्री दर्शविण्यासाठी किंवा फ्लर्ट करण्यासाठी केला जातो. एखाद्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीला निरोप देतानाही या किसचा वापर केला जातो.एस्किमो किस पालक वात्सल्याची भावना बऱ्याचदा एस्किमो किसद्वारे व्यक्त करतात. या किसमध्ये नाकाला नाकाने स्पर्श करतात. टुंड्रा प्रदेशातील एस्किमो लोक असे किस करतात म्हणून त्याला ‘एस्किमो किस’ असे म्हटले जाते.फ्रेंच किस किसमध्ये फ्रेंच किस हे अत्यंत लोकप्रिय आहे. या किसमध्ये पार्टनर एकमेकांच्या जीभेला स्पर्श करतात. नात्यातील पुढचं पाऊल म्हणून या किसकडे पाहिलं जातंसिंगल लिप किस प्रियकर आणि प्रेयसीमध्ये प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी सिंगल लिप किस प्रसिद्ध आहे. लिंजरिंग लिप किस एकमेकांप्रती तीव्र प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी लिंजरिंग लिप किस केलं जातं. टीझर किस बर्याच दिवसांनी भेटणार्या व्यक्तीविषयी प्रेम दर्शविण्यासाठी कपाळावर, ओठ, हातावर किस करतो त्याला टीझर किस म्हटलं जातं. टॅग्स :रिलेशनशिपव्हॅलेंटाईन वीकrelationshipValentine WeekRelationship Tips