know your children personality from their favorite color
मुलांच्या आवडत्या रंगावरुन ओळखा त्यांची पर्सनॅलिटी By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 02:56 PM2019-01-29T14:56:25+5:302019-01-29T15:30:14+5:30Join usJoin usNext लहान मुलं कधी अतिशय आनंदी, तर कधी खूप शांत असतात. त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेणे म्हणजे पालकांची एकप्रकारची कसोटीच असते. पण आवडत्या रंगावरुन त्यांचे नेमके व्यक्तिमत्त्व तुम्ही जाणून घेऊ शकता. मुलांचे आवडते रंग त्यांच्या स्वभावाचे कित्येक रहस्यं उलगडण्यास मदत करतात. जाणून घेऊया तुमच्या मुलांच्या आवडत्या रंगावरुन नेमकी कोणती माहिती मिळते.1. निळा रंग ज्या मुलांना निळा रंग आवडतो, ते स्वभावाने अगदी सरळही नसतात आणि मस्तीखोरही नसतात. या मुलांना खेळासहीत अभ्यासाचाही तेवढी आवड असते. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणं, हे या मुलांचे वैशिष्ट्यं असते. आपल्यातला हा गुण दुसऱ्यांसमोर जाहिररित्या मांडण्यासही ही मुलं मागे नसतात. 2. लाल रंग लाल रंग आवडणाऱ्या मुलांचा स्वभाव अतिशय मस्तीखोरी आणि स्वच्छंदी असतो. आपल्या खासगी आयुष्यात या मुलांना कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ केलेली आवडत नाही. अतिशय हुशार आणि प्रत्येक वेळेस अॅक्टिव्ह राहणारी ही मुलं स्पष्टवक्ते असतात. 3.पिवळा रंग पिवळा रंग आवडणाऱ्या मुलांना कोणत्याही गोष्टीतलं साधेपण लवकर भावते. साधारण आणि सरळ आयुष्य जगणं यांना अधिक पसंत असते. महत्त्वाचे म्हणजे आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी ही मुलं लगेचच कोणाशीही शेअर करत नाहीत आणि या मुलांना खोटे बोलणे आवडत नाही. 4. गुलाबी रंग तसं पाहायला गेलं तर गुलाबी रंग कोणालाही आवडेल असाच आहे. पण मुलींना गुलाबी रंग अतिशय प्रिय असतो, असे मानले जाते. ज्या मुलांना हा रंग आवडतो, ती मुलंही सहजासहजी आपल्या मनातल्या गोष्टी इतरांसोबत शेअर करत नाहीत. यांनाही खोटे बोलणं अजिबात पसंत नसते. या मुलांना निसर्गाचीही अतिशय आवड असते. दानधर्म वगैरे सारखी कार्य करण्यामध्ये यांचा अधिक ओढा असतो. 5. काळा रंग काळा रंग आवडणारी मुलं अतिशय हुशार, कुशाग्र बुद्धीची असतात. पण ही मुलं अगदी कोणासोबतही आपल्या खासगी गोष्टी शेअर करतात, ही बाब त्यांनी कटाक्षानं टाळलं पाहिजे. सत्य तोंडावर बोलण्याची हिंमत या मुलांमध्ये असते. पण यांचे हृदय अतिशय स्वच्छ असते. कोणाबद्दल ईर्ष्या, कपट, दुजाभाव यांच्या मनात नसतो. काळा रंग आवडणाऱ्या मुलांचे हेतू अतिशय स्पष्ट असतात. आयुष्यात जे काही करायचं असते, ती गोष्ट ते पूर्ण करतातच. 6. हिरवा रंग ज्या मुलांचा आवडता रंग हिरवा असतो, ते आपल्या स्वभावाने कोणालाही स्वतःकडे आकर्षित करतात. या मुलांमध्ये आत्मविश्वासदेखील भरपूर असतो. आयुष्यात येणाऱ्या मोठ-मोठ्या आव्हानांचा सामना ते हिंमतीने करतात. विशेष म्हणजे ही मुलं नेहमी सकारात्मक करतात. टॅग्स :रिलेशनशिपमानसिक आरोग्यपालकत्वrelationshipMental Health TipsParenting Tips