lifestyle benefits of playing peekaboo with kids development
...म्हणून लहान मुलांना लपाछपी खेळायला आवडतं By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 07:39 PM2020-01-24T19:39:20+5:302020-01-24T19:44:00+5:30Join usJoin usNext लहान मुलांना खेळायला प्रचंड आवडतं. लपाछपी हा सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. मात्र मुलांना लपाछपी खेळायला जास्त का आवडतं याचं नेमकं कारण जाणून घेऊया लपाछपी हा केवळ एक मजेदार खेळ नसून पॉवरफूल लर्निंग टूल आहे. चिमुकले तासनतास हा खेळ खेळतात. विविध ठिकाणी लपायला त्यांना फार मजा येते. काही लहान मुलांच्या समोरून त्यांचे पालक अथवा एखादी गोष्ट काही काळासाठी गायब झाली ते कधी गोंधळतात. तर कधी हसतात. लपाछपी खेळताना अनेकदा मुलांना असं करायला मजा येत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. स्विस डेव्हलपमेंट सायकोलॉजिस्ट जीन पिआजे यांनी या प्रिन्सिपलला ऑब्जेक्ट पर्मानेन्स असं नाव दिलं आहे. लहान मुलं आपल्या आयुष्यातील दोन वर्ष हेच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. लहान मुलं जसजशी मोठी होतात तसं त्यांना अनेक गोष्टी समजतात. लहानपणी एखादी व्यक्ती आवाज देत असेल म्हणजेच हाक मारत असेल तर तो आवाज कुठून येतो याचा शोध घेतला जातो. लपाछपी खेळताना चिमुकल्यांचा सेन्स स्टिम्यूलेट करतं. तसेच व्हिज्युअल ट्रेकिंग मजबूत होतं आणि सोशल डेव्हलपमेंटमध्ये ही वाढ होते. सेन्स ऑफ ह्यूमरही या खेळाने चांगला होता. लपाछपी खेळताना इतरांना शोधायला मजा येते. त्यातही भन्नाट जागी अनेकजण लपत असल्याने मुलांना शोधायला गंमत वाटते. त्यामुळे चिमुकल्यांना हा खेळ अधिक आवडतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. टॅग्स :पालकत्वParenting Tips