Meeting with girlfriends parents
गर्लफ्रेन्डच्या आई-वडिलांना भेटण्याआधी जाणून घ्या या गोष्टी! By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 03:13 PM2018-10-02T15:13:13+5:302018-10-02T15:27:14+5:30Join usJoin usNext जर तुम्हाला तुमच्या गर्लफ्रेन्डसोबतचं नातं पुढच्या लेव्हलला घेऊन जायचं असेल म्हणजे लग्न करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाल गर्लफ्रेन्डच्या आई-वडिलांना भेटायला जावं लागेल. आपल्या होणाऱ्या सासू-सासऱ्यांना भेटायला जाणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे तुमच्यासाठी चांगले राहिल. असा करा होमवर्क : तुम्ही गर्लफ्रेन्डच्या घरच्यांना भेटायला जाणार असाल तर आधीच गर्लफ्रेन्डकडून तिच्या घरच्यांबाबत काही गोष्टी विचारुन ठेवा. याने तुम्हाला त्यांच्याशी बोलण्यास मदत मिळेल. तसेच तिला हेही विचारा की, तुम्ही घरी आले असताना कसे वागावे. म्हणजे खूप जास्त फ्रेन्डली वागायचंय की, नॉर्मल कारण तिच्या घरचे लोक कसे आहेत हे तिल जास्त चांगलं माहीत असतं. (Image Credit : www.victoriabuzz.com) कपडे कसे निवडाल - कपडे नेहमी आपल्या आवडीनुसार नाही तर वेळ, कार्यक्रम, निमित्त काय आहे याचा विचार करुन निवडायला हवे. कारण तुमची त्यांच्याशी होणारी ही पहिली भेट आयुष्यभर त्यांच्या आणि तुमच्या लक्षात राहणार आहे. अशात व्यवस्थित कपड्यांची निवड करा. तसेच जाताना त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचं काही गोड पदार्थ घेऊन गेलात तर त्यांना आनंद होईल. बोलण्याआधी विचार करा - फार जास्त आत्मविश्वास किंवा घाबरुन बोलू नका. कंट्रोलमध्ये रहा आणि जे काही बोलाल ते विचार करुन बोला. आणि उगाच जास्त चढवून काही सांगू नका, जे तुम्ही भविष्यात पूर्ण करु शकाल नाही. खूप जास्त बढाया मारण्याचीही गरज नाही कारण तसे कराल तर समोरच्यांना ते लक्षात येईल आणि तुमचं इम्प्रेशन डाऊन होऊ शकतं. (Image Credit : NBT) बॉडी लॅंग्वेज - उठता-बसताना आणि बोलताना आपल्या बॉडी लॅंग्वेजकडे लक्ष द्या. हे लक्षात ठेवा की, तुमच्या बॉडी लॅंग्वेजवरुन तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. सकारात्मक व्यवहार ठेवा. कान आणि मोबाईल अलर्ट मोडवर ठेवा - हे फार गरजेंच आहे की, गर्लफ्रेन्डच्या आई-वडिलांना भेटायला गेल्यावर डोळे, कान आणि मोबाईल अलर्ट मोडवर ठेवा. जेणेकरुन वेळेवर काही अडचण होऊ नये. तसेच जर तुमची गर्लफ्रेन्ड तुम्हाला मेसेजच्या माध्यमातून काही सूचना देत असेल तर त्यावरही लक्ष ठेवा. फ्रेन्डली वागा - त्यांच्या घरी जाऊन टिपिकल पाहुणा होण्यापेक्षा फ्रेन्डली वागा. लंच किंवा डिनरसाठी टेबल सजवताना तिची मदत करा. जेवणही वाढण्याचा प्रयत्न करा. तुमच्या या वागण्याचं त्यांनाही चांगलं वाटेल. इगो बाजूला ठेवा - तिचे आई-वडील कितीही फ्रेन्डली वागले तरी हे विसरु नका की, तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष आहे. कोणत्याही मुद्द्यावर वाद घालण्याआधी एकदा विचार करा. स्वत: बरोबर सिद्ध करण्याच्या नादात इम्प्रेशन डाऊन करु नका. टॅग्स :रिलेशनशिपलग्नrelationshipmarriage