most common fights couples have according to a relationship
छोट्या-छोट्या भांडणांमुळे जोडप्यांमध्ये दुरावा नव्हे, जवळीक वाढते! By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 02:35 PM2018-10-08T14:35:08+5:302018-10-08T14:45:04+5:30Join usJoin usNext 1. कम्युनिकेशन गॅप : प्रत्येक नातं टिकवण्यासाठी किंवा टिकण्यासाठी त्यामध्ये 'संवाद' हा महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतो. एखाद्या जोडप्यामध्ये संवाद नसेल तर ते नातं कंटाळवाणे वाटू लागते आणि त्यामध्ये गैरसमज होण्यास सुरुवात होतात. जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत कमी बोलत असेल तर त्याच्या/तिच्यासोबत भांडण करणं तर बनता है बॉस. 2. कामाचे टेन्शन : जर तुम्ही दोघेही नोकरी करत असाल तर घरातील कामं वाटून घ्यावीत. जर ऑफिसमधील कामांसहीत घरातील कामांची जबाबदारीदेखील तुम्ही घेत असाल तर पार्टनरसोबत भांडण करण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. अगदीच भांडण करावसं तुम्हाला वाटत नसेल तर निदान जाहीररीत्या तक्रार तरी करा. 3. जीवघेणा एकटेपणा : आयुष्यात जर तुम्ही व्यस्त असाल तर एकटेपणाची जाणीव तितकीशी होत नाही. पण जोडप्यातील एकाला एकटेपणाची जाणीव होत असेल तर ही बाब आपल्या पार्टनरसोबत नक्की शेअर करावी. आपल्याला होणार त्रास खुलेपणानं पार्टनरसमोर मांडावा, जेणेकरुन टोकाचे गैरसमज किंवा वाद होणार नाहीत. 4. मित्र-मैत्रिणींवरुन वाद : मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांमुळे एखाद्या कपलमध्ये भांडण झालेले नाही, अशी प्रकरणं क्वचितच आढळतील. फ्रेंड सर्कलमध्ये एक मित्र किंवा मैत्रीण अशी असतेच ज्यांना आपले पार्टनर पसंत करत नाहीत. त्यामुळे कोण्या तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या सुंदर नात्यात कटुता येऊ देऊ नका. पार्टनरसोबत सविस्तर चर्चा करुन वाद मिटवा. 5. आर्थिक वाद : आर्थिक कारणांमुळेही रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. एकमेकांसोबत आपापल्या आर्थिक योजना शेअर करा. एकमेकांच्या गरजा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण आर्थिक कारणांमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ देऊ नका. 6. शारीरिक संबंध : शारीरिक संबंधांमुळेही जोडप्यामध्ये भयंकर वाद निर्माण होऊ शकतात. कधी कधी कपलमधील एक जण शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास तयार नसतो. कदाचित तुमचा पार्टनर काही गोष्टींच्या ताण-तणावात असेल, त्याला/तिला समजून घ्या. पण वारंवार असे होत असेल तर पार्टनरसोबत तुमचे वाद घालणे आक्षेपार्ह नाही. पण या भांडणामुळे तुमच्या जवळीकता निर्माण झाली पाहिजे. जेणेकरुन तुमच्यातील प्रेम कायम राहील. टॅग्स :रिलेशनशिपलग्नrelationshipmarriage