Mother's Day Gift 2019 budget gift idea to make mothers day memorable
Mother's Day Gift : स्वस्तात मस्त... आईसाठी खरेदी करा अशी गिफ्ट्स! By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 07:54 PM2019-05-09T19:54:18+5:302019-05-09T20:13:32+5:30Join usJoin usNext मदर्स डे म्हणजे, आई आणि मुलांचा सेलिब्रेशनचा दिवस. या दिवशी मुलं वेगवेगळ्या पद्धतींनी मुलांना खूश करण्याचा प्रयत्न करतात. ज्यामध्ये सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे, त्यांना एखादी भेट देणं. जी मुलं कामाला जातात त्यांच्यासाठी भेटवस्तू देणं अगदी सोपं असतं. पण काही मुलं अजूनही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जात असतील. त्यांचा पॉकेटमनी कमी आहे. हे गिफ्ट देण्यासाठी मुलं अधिक पैसे खर्च करू शकत नाहीत. पण या महागाईच्या जगामध्ये एवढ्या कमी पैशांमध्ये मिळतं तरी काय? पण काळजी करू नका. तुमचंही हेच मत असेल तर, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आईला गिफ्ट देण्यासाठी काही गिफ्ट आयडिया... मोबाईल फोन कव्हर : आजकाल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांकडेच मोबाईल फोन आहे. लिपस्टिक : 200 ते 300 रूपयांच्या बजेटमध्ये चांगल्या ब्रँडची लिपस्टिक सहज मिळते. याव्यतिरिक्त तुम्ही मदर्स डे साठी ऑनलाईन ऑफर्सचाही लाभ घेऊ शकता. काजळ : जर तुमची आई दररोज काजळ वापरत असेल तर तुम्ही तिला काजळ गिफ्ट करू शकता. काजळाशिवाय अनेक कॉस्मॅटिक्स प्रोडक्टही निवडू शकता. स्किन केयर प्रोडक्ट : एखादी क्रिम किंवा मॉयश्चरायझर जे तुमची आई वापरत असेल. ते तिला गिफ्ट करू शकता आणि ते तुमच्या बजेटमध्येही असेल. फोटो फ्रेम : आईसोबत असलेला तुमचा सर्वात चांगला फोटो प्रिंट करा आणि त्याची एक फ्रेम करून आईला गिफ्ट करा. पुस्तक : जर तुमच्या आईला वाचण्याची आवड असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार एखादं पुस्तक गिफ्ट करू शकता. ऑनलाइन ऑफर असेल तर तिथे तुम्हाला आणखी काही ऑप्शन्स मिळतील. की चैन : मदर्स डेच्या खास दिवसासाठी गिफ्ट शॉपमध्ये आईसाठी खास कि चैन उपलब्ध असतात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. कप सेट : महिलांना आपल्या किचनमध्ये कप सेटचं कलेक्शन ठेवायला फार आवडतं. तुम्ही आईसाठी खास कपसेट खरेदी करू शकता. ईयरिंग्स : जर तुमची आई आर्टिफीशियल ज्वेलरी वेअर करायला आवडत असेल तर तिच्यासाठी ईयरिंग्स घेऊ शकता. कॉस्मेटिक पाउच : आईला कॉस्मेटिक सामान ठेवण्यासाठी एखादं पाउच द्या. छोटी पर्स : आईसाठी एक छोटीशी पर्स घ्या, तुम्हाला ऑनलाइन काही खास ऑफर्स मिळतील. फॅमिली गेम : आई कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवण्याचं काम करते. अशावेळी एक फॅमिली गेम मदत करू शकतो. एक बोर्ड गेम खरेदी करा आणि दररोज रात्री संपूर्ण कुटुंबासोबत खेळा. कॉफी कप : मदर्स डेच्या निमित्ताने गिफ्ट शॉपमध्ये अनेक कॉफी मग अवेलेबल असतात. तुमच्या बजेटनुसार तुम्ही निवड करू शकता. टॅग्स :जागतिक मातृदिनरिलेशनशिपMothers DayRelationship Tips