Parenting tips to handle naughty child
मस्तीखोर मुलांना शांत करण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 02:46 PM2019-09-08T14:46:14+5:302019-09-08T14:53:34+5:30Join usJoin usNext लहान मुलं खूप मस्ती करतात. अनेकदा त्यांच्या मस्तीमुळे पालकांना मनस्ताप होतो. मस्तीखोर मुलांना शांत करण्यासाठी कोणत्या गोष्टी फायदेशीर ठरतील हे जाणून घेऊया.सकारात्मक उत्तरं द्या लहान मुलांच्या मनात अनेक प्रश्न असतात. तसेच काही गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्यांच्या सर्व प्रश्नांची सकारात्मक उत्तरं द्या. यामुळे मुलं समाधानी होतील आणि जास्त मस्ती देखील करणार नाहीत. चांगल्या गोष्टी सांगा मुलांना गोष्टी ऐकायला आवडतात. त्यामुळे त्यांना प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या, महापुरुषांच्या, लोकप्रिय व्यक्तींच्या गोष्टी सांगा. ज्यामुळे मुलांना देखील प्रेरणा मिळेल. अभ्यासाची गोडी लावा मुलं जास्त मस्ती करत असल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून द्या. त्याची गोडी लावा म्हणजे ते स्वत: अभ्यास करतील. मोकळेपणाने संवाद साधा मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घ्या. तसेच सुट्टीच्या दिवशी त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. मेडीटेशन शिकवा लहान मुलांना मेडीटेशन शिकवणं थोडं कठिण आहे. एकाग्रता वाढण्यासाठी त्याची मदत होईल. नियोजन करायला शिकवा मुलांना वेळेचं महत्त्व पटवून द्या. त्यांना नियोजन करायला शिकवा. तसेच त्यांना प्रोत्साहन द्या आणि समजून सांगा. तिखट, तेलकट पदार्थ देऊ नका लहान मुलांच्या आहाराची विशेष काळजी घ्या. त्यांना तिखट, तेलकट पदार्थ देऊ नका. तसेच जंकफूडपासून लांब ठेवा. टॅग्स :पालकत्वParenting Tips