मुलांसाठी पर्सनल टीव्ही घेण्याचा विचार आहे? मग हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:54 PM2019-09-03T13:54:23+5:302019-09-03T13:58:13+5:30

लहान मुलं जास्त वेळ टीव्ही पाहतात अशी अनेक पालकांची तक्रार असते. बाहेर खेळायला जाण्याऐवजी मुलं टीव्ही पाहण्याला अधिक पसंती देतात.

काही मुलांसाठी घरामध्ये पर्सनल टीव्ही असतो. मात्र मुलांसाठी पर्सनल टीव्ही नुकसानदायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. एका संशोधनामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

काही मुलं तासनतास टीव्हीसमोर बसलेली असतात. टीव्ही पाहणं ही गोष्ट चुकीची नाही मात्र जास्त वेळ टीव्ही पाहिल्यास मुलांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अधिक असते.

पेडियाट्रिक रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित करणाऱ्या एका लेखामध्ये लहान वयात जास्त टीव्ही पाहणाऱ्या मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासावर त्याचा परिणाम होत असल्याचं म्हटलं आहे. यामुळे मुलांचं भविष्यात नुकसान होऊ शकतं.

संशोधनकर्त्यांनी यासाठी जवळपास 1859 मुलांची माहिती जमा केली होती. याशिवाय त्यांनी 13 वर्षापर्यंतच्या इतर मुलांचा देखील अभ्यास केला.

ज्या मुलांकडे त्यांचा पर्सनल टीव्ही आहे त्याच्या आरोग्यावर त्याचा सर्वात जास्त परिणाम होतो. त्यांना डिप्रेशनसारख्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे. लहान मुलांना टीव्ही पाहायला जास्त आवडत असल्याने अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे मुलांना शिकवणं हे पालकांसाठी थोडं कठीण काम असतं.