Relationship story boyfriend is worried about rich girlfriend expenses
बाबो! जादा कमवणाऱ्या गर्लफ्रेंडनं लग्नासाठी ठेवली ‘अशी’ अट, ज्यानं बॉयफ्रेंड चिंतेत पडला By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 03:17 PM2021-08-06T15:17:56+5:302021-08-06T15:23:03+5:30Join usJoin usNext कोणत्याही नात्यात सर्वात जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे सामंजस्यपणा. तुम्ही एकमेकांसारखे नसला तरी तुमच्यात सामंजस्यपणा नसेल त्याचा काहीच उपयोग नाही. एका पुरुषाने त्याच्या गर्लफ्रेंडकडून होणाऱ्या जास्तीच्या खर्चाबाबत रिलेशनशिप एक्सपर्टकडे मदत मागितली. पुरुषाचं म्हणणं आहे की, त्याच्या गर्लफ्रेंडची एकूण संपत्ती २ कोटी डॉलर आहे. तर माझी संपत्ती १० लाख डॉलर आहे. मी नशीबवान आहे ती माझ्यावर खूप प्रेम करते. लवकरच आमचं लग्न होणार आहे. परंतु आम्ही लग्नाआधी अनेक गोष्टी निश्चित केल्या आहेत. मात्र माझ्या गर्लफ्रेंडला भविष्यात तिची भव्य लाइफस्टाइलशी तडजोड करावी लागेल की काय याची चिंता सतावत आहे. ती एका वर्षाला ३५०००० डॉलर कमवते. त्यात बोनसचा समावेश नाही. तर माझी एक वर्षाची कमाई ओवरटाइम आणि बोनस मिळून २२५००० डॉलर आहे. कॅश, रिटायरमेंट सेविंग, घराचे शेअर मिळून एकूण संपत्ती १ मिलियन डॉलर आहे. आमच्या दोघांवर कोणतंही कर्ज नाही. आमच्या दोघांनाही पहिल्या पार्टनरकडून मुलं आहेत ती युवा आहेत. माझ्या दोन मुली आहेत त्यांच्या शिक्षणासाठी पैसे वाचवत आहे. तर माझ्या गर्लफ्रेंडचा एक मुलगा आहे त्याचं शिक्षण फॅमिली ट्रस्टमधून केले जाते. माझ्या गर्लफ्रेंडचा मुलगा महागड्या आणि चांगल्या गोष्टीचा शौकीन आहे तर मी माझ्या मुलींना केवळ काम चालवण्या इतपत गोष्टी खरेदी करू शकतो. माझी मुलं लहान खर्च स्वत: उचलतात. आम्ही दोघं ५० वर्षाचे आहोत तर ६० व्या वर्षी निवृत्त होऊ. माझ्या गर्लफ्रेंडची नोकरी खूप चांगली आहे. माझी तणावाची नोकरी आहे. मी दरवर्षी एकूण कमाईतून केवळ २० टक्केच वाचवू शकतो. माझी गर्लफ्रेंड तिच्या लाइफस्टाइलमध्ये कुठल्याही गोष्टीची तडजोड करू शकत नाही. आर्थिक व्यवहार आम्ही एकमेकांपासून लपवत नाही. तरीही मी अजब स्थितीत अडकलो आहे. मी प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करतो तर माझी गर्लफ्रेंड असं करत नाही. माझी गर्लफ्रेंड एक फॅन्सी लग्न करू इच्छिते. त्याशिवाय प्रेम आणि कमिटमेंट पाहता मी या लग्नाचा अर्धा खर्च करावा असं तिला वाटतं. इतकंच नाही तर महागडी अंगठी आणि लग्नानंतर स्पेशल ठिकाणी जाण्याचा प्लॅन करते. जर मी हा म्हटलं तर एक पैसाही माझ्याकडे शिल्लक राहणार नाही. तर माझी गर्लफ्रेंड म्हणते की इथपर्यंत पोहचण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे कुठलीही आर्थिक तंगी तिला होऊ द्यायची नाही. आमची चर्चा नेहमी या गोष्टीवर येऊन थांबते की, आम्ही कोणताही व्यवहार करणार नाही. गोष्टी सुरळीत चालतील. काही ना काही मार्ग निघेल. मी जुन्या काळातील विचारसरणीचा माणूस आहे. मी विचार करतो की, माझ्या गर्लफ्रेंडनं शाही लग्न, थाटमाट, मोठी स्वप्न यासाठी वायफळ पैसा खर्च करू नये. त्यामुळे आमचं नात खराब होत आहे. रिलेशनशिप एक्सपर्टने पुरुषाला सल्ला दिला की, तुमचं लग्न, हनीमून दोन्ही असं झालं पाहिजे जेणेकरून दोघांवर आर्थिक बोझा पडणार नाही. हा खर्च अर्धा अर्धा घ्यावा यावर मी सहमत आहे. जर तुमची गर्लफ्रेंड लग्न, हनीमून हायप्रोफाईल करू इच्छित असेल तर तो फिक्स खर्चाव्यतिरिक्त असावा त्याचसोबत शाही लग्न अधिक काळ टिकतेच असं नाही. तुम्ही कमीत कमीत पैशात लहान लहान गोष्टीतून लग्न कायम लक्षात राहील असं करू शकता. जर तुम्हाला नातं टिकवायचं आणि पुढे न्यायचं असेल तर यावर सहमती बनवायला हवी. तुम्ही तुमच्या बजेटनुसार रिंग खरेदी करा. जर तुमची गर्लफ्रेंड आणखी कुठली अंगठी मागत असेल तर भविष्यात स्वत: ती खरेदी करू शकते जास्त पैसै कमवण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जीवनात तडजोड करणं विसराल. लग्नापूर्वी तुम्हाला गर्लफ्रेंडसोबत या सर्व गोष्टीचा खुलासा स्पष्ट करावा लागेल. जर तुमची गर्लफ्रेंड भव्य लाइफस्टाइलपेक्षा तुमच्या पैशाची आणि भावनेची इज्जत करत असेल तर तुमची चिंता समजून घेऊन स्वत:ला त्यासाठी तयार करेल. टॅग्स :लग्नmarriage