गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडने हैराण झाला बॉयफ्रेन्ड, रोजच्या वैतागामुळे एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव! By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 11:18 AM 2021-04-10T11:18:19+5:30 2021-04-10T11:34:59+5:30
त्याने सांगितले की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत गेल्या तीन वर्षापासून नात्यात आहे. ती एक हुशार, सुंदर आणि चांगली मुगली आहे. पण तो तिच्या एका सवयीमुळे हैराण झाला आहे. गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडच्या घटना नेहमीच समोर येत असतात. अशाच आपल्या गर्लफ्रेन्डच्या विचित्र डिमांडला वैतागलेल्या एका बॉयफ्रेन्डने एक्सपर्टकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. एका रिलेशनशिप पोर्टलवर एका तरूणाने सल्ला मागितला आहे. त्याने सांगितले की, तो त्याच्या गर्लफ्रेन्डसोबत गेल्या तीन वर्षापासून नात्यात आहे. ती एक हुशार, सुंदर आणि चांगली मुगली आहे. पण तो तिच्या एका सवयीमुळे हैराण झाला आहे. (सर्व छायाचित्रे प्रातिनिधिक)
तरूणाने लिहिले की, 'माझ्या गर्लफ्रेन्डमध्ये सर्व सवयी चांगल्या आहेत. पण तिची एक सवय फार अजब आणि विचित्र आहे. कोणतंही काम केल्यावर तिला माझ्याकडून तिच्या कौतुकासोबतच टीकाही ऐकायची असते'. म्हणजे तिला तिने केलेल्या कामावर नकारात्मक प्रतिक्रियाही हवी असते.
त्याने लिहिले की, 'जेवण तयार करण्यापासून मला गिफ्ट देणे किंवा माझ्यासाठी कोणतंही काम केल्यानंतर तिला माझ्याकडून थॅंक्यू सोबतच एका चांगल्या टिकेचीही अपेक्षा असते. तिच्या कामात चुका काढल्या नाही फक्त चांगलं म्हटलं तर ती नाराज होते'.
तरूणाने लिहिले की, 'मला तर नेहमीच हे म्हणावं लागलं की, जेवण तर चांगलं होतंच, पण बटाट्याला टेस्ट नव्हती. तुझं पॉवर पॉइंट चांगलं होतं पण रंगाचा वापर तू चुकीचा केला. इतकेच नाही तर तिच्यातील कमतरता ऐकण्याची तिची ही सवय आमच्या लैंगिक जीवनातही लागू पडते'.
'जेव्हाही आम्ही शरीरसंबंध ठेवतो तेव्हा मला परफॉर्मन्सबाबत काहीना काही उणिवा तिला सांगाव्याच लागतात. पण मला काहीच कमतरता दिसून येत नाही. आता स्थिती अशी झाली आहे की, भांडणापासून वाचवण्यासाठी मला जबरदस्ती तिच्या कामात कमतरता काढावी लागते'.
'खरं सांगायचं तर मी या गोष्टींची एक लिस्ट तयार केली आहे. ज्यात तिला कोणकोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे ते आहे. जर मी तिच्या कामावर टीका केली नाही तर तिला पॅनिक अटॅक येतो. तिच्या घरातलेही सगळे चांगले आहेत पण सर्वांना परफेक्ट दिसण्याची सवय आहे'.
'मी अनेकदा तिला थेरपिस्टला भेटण्याचा सल्ला दिला. पण ती मझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते. तिला वाटतं की, यात काहीच चूक नाही. तिला वाटतं की, तिला हे जाणून घेणं आवडतं की, ती गोष्टींना आणखी कशी सुधारू शकते. जेणेकरून ती आणखी चांगली व्यक्ती होऊ शकेल'.
त्याने पुढे लिहिले की, 'मला तिच्यासोबत ब्रेकअप करायचं नाहीये. पण मला हे कळत नाहीय की, मी कशाप्रकारे माझ्या तोंडून तिची टीका ऐकण्याची सवय बदलू शकतो.
तरूणाच्या या समस्येवर उत्तर देताना एक्सपर्टने लिहिले की, 'स्वत:त बदल करण्यासाठी पार्टनरचा सल्ला घेणं स्वाभाविक आणि योग्य आहे. पण ही सुधारण नातं मुळात आणखी चांगलं करण्यासाठी केली जावी. जबरदस्तीने काही करू नये'.
एक्सपर्टने सल्ला दिला की, 'तुम्ही तुमच्या गर्लफ्रेन्डला समजावा की, जबरदस्ती उणिवा ऐकण्याची तिची सवय योग्य नाही. यामुळे तुम्ही फार दबावात राहता आणि तिला वाईट वाटू नये म्हणून खोटंही बोलावं लागतं. जर तुमच्या गर्लफ्रेन्डला खरंच तिच्यातील उणिव जाणून घ्यायची असेल तर तुम्ही सांगितलेली ही उणिव ती समजून घेण्याचा प्रयत्न करेल'.