skipping rope benefits for kids
मुलांना सुदृढ ठेवायचंय? 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 11:38 AM2019-11-04T11:38:25+5:302019-11-04T11:51:19+5:30Join usJoin usNext मुलांच्या शारीरीक विकासासाठी आहार जितका महत्त्वाचा असतो. तितकाच व्यायाम देखील गरजेचा असतो. मुलांना खेळायला आवडतं. आजकालची मुलं ही मैदानी खेळ खेळण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक गेम्स आणि व्हिडीओ गेम्समध्येच रमलेली असतात. मुलांना सुदृढ ठेवायचं असल्यास कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे जाणून घेऊया. मुलांन दोरी उड्या मारायला शिकवा. यामुळे त्याच्या शरीराची हालचाल होईल. तसेच उंची देखील वाढेल. दोरी उड्या मारल्यास शरीर निरोगी राहतं. लहान वयात काही मुलांना लठ्ठपणाचा त्रास होतो. मात्र अशा पद्धतीने व्यायाम केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. दोरी उड्या मारणं हे कार्डियो एक्सरसाइज असल्याने यामुळे हार्ट बीट नीट राहतात. रक्तप्रवाह सुरळीत सुरू राहतो. त्वचेसाठी दोरी उड्या मारणं फायदेशीर असतं. तसेच यामुळे मुलं फ्रेश आणि आनंदी होतात. टॅग्स :पालकत्वParenting Tips