some easy ways to get kids to read and learn
मुलांना शिकवण्याचे काही सोपे फंडे By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 04:37 PM2019-07-16T16:37:51+5:302019-07-16T16:44:28+5:30Join usJoin usNext लहान मुलांना खेळायला जास्त आवडत असल्याने अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे मुलांना शिकवणं हे पालकांसाठी थोडं कठिण काम असतं. मुलांना शिकवण्याचे काही सोपे फंडे जाणून घेऊया. खेळ मुलांसोबत खेळताना त्यांना अनेक गोष्टी शिकवा. पुस्तकांसोबतच गणितातील आकडे आणि फॉर्मुले लक्षात राहावे यासाठी सोप्या ट्रिक्स वापरा. खेळताना शिकवलेल्या गोष्टी मुलांच्या कायम लक्षात राहतात.फोटो अथवा वस्तू लहान मुलांना फोटो अथवा वस्तू पाहायला आवडतात. त्यामुळे फोटो, वस्तू आणि व्हिडीओच्या मदतीने लहान मुलांना शिकवल्यास त्यांच्या ते लक्षात राहत. फोटो असलेल्या गोष्टी अधिक वेळ लक्षात राहतात. शिकवताना कठोर होऊ नका मुलांचा अभ्यास घेताना कठोर होऊ नका तर त्यांना प्रेमाने शिकवा. मुलांना खूप प्रश्न पडतात. त्यांच्या सर्व प्रश्नांची योग्य उत्तरं द्या. मुलांना घाबरवू नका मुलांनी अभ्यास केला नाही तर त्यांच्यावर पालक ओरडतात अथवा त्यांना एखाद्या गोष्टीची भीती दाखवली जाते. असं करू नका कारण अशा पद्धतीने वागल्यास मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो. नवीन गोष्टींची माहिती द्या मुलांना अभ्यासासोबतच बाहेर फिरायला घेऊन जा. तिथे त्यांना नवनवीन गोष्टींची माहिती द्या. मुलांना आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींचे कुतूहल असते. त्यामुळे त्यांना त्याची माहिती द्या. टॅग्स :पालकत्वParenting Tips