these parenting mistakes have a negative impact on your child
मुलांची काळजी घेताना पालकांनी 'या' चुका टाळा By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2019 03:25 PM2019-06-02T15:25:52+5:302019-06-02T15:40:19+5:30Join usJoin usNext मुलांना समजून घेणं थोडं अवघड असतं असं म्हटलं जातं. त्यामुळेच त्याच्यावर योग्य संस्कार करताना काळजी घेण्याची गरज असते. मुलांना समजावण्याची प्रत्येक पालकांची पद्धत ही वेगवेगळी असते. मात्र त्यांना शिकवताना पालकांच्या काही चुका त्यांनाच महागात पडू शकतात. मुलांवर त्याचा वाईट परिणाम होतो. तसेच ते नकारात्माक विचार करायला लागतात. त्यामुळेच मुलांची काळजी घेताना, त्यांच्यावर संस्कार करताना पालकांनी कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेऊया. मुलांवर सारखं रागावणं लहान मुलांकडून काही चुका होत असतात. मात्र त्यामुळे त्याच्यावर रागावण्याची काही पालकांना सवय असते. मुलांना सातत्याने रागावू नका. यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा होईल. तसेच मुलं पालकांना घाबरून खोटं बोलण्याची शक्यता असते. प्रेम न करणं पालकांचं मुलांवर खूप प्रेम असतं. मात्र मुलं लाडावली जाऊ नयेत म्हणून ते व्यक्त करत नाहीत. पण तुमचं मुलांवर असलेलं प्रेम व्यक्त करा. त्यांचे लाड करा. मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे आई-वडील आणि मुलांमधील नातं आणखी घट्ट होईल. दुसऱ्यांसमोर ओरडणं अथवा मारणं मुलांना चांगली शिस्त लागावी म्हणून पालक मुलांना ओरडतात तर कधी कधी मारतात. मात्र दुसऱ्या व्यक्तींसमोर मुलांना रागावू नका. तसेच त्यांना मारू नका. यामुळे मुलांना अधिक वाईट वाटू शकतं आणि पालकांचा राग येऊ शकतो. प्रोत्साहन न देणं किंवा कौतुक न करणं लहान मुलांना वेगवेगळ्या गोष्टी करण्याची सवय असते. त्यांना प्रोत्साहन द्या. जेणेकरून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळेल. तसेच मुलांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचे कौतुक करा. दुसऱ्यांसोबत तुलना करू नका अनेक पालकांना आपल्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलांसोबत करण्याची सवय असते. पण असं करू नका. लहान मुलं निरागस असतात. त्यांच्या मनावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो.टॅग्स :पालकत्वParenting Tips