लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतील हे सुपरफूड्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 02:43 PM2018-11-20T14:43:53+5:302018-11-20T19:58:13+5:30

1. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर आणि कार्बोहायड्रेट ही पोषकतत्त्वं प्रचंड प्रमाणात असतात. यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे आजारांविरोधात लढण्यासाठी त्यांच्या शरीराला ऊर्जा मिळते.

2. अळशीच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड, ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि फायटोस्ट्रोजेनचे प्रमाण भरपूर असते. नियमित याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास लहान मुलांना कित्येक आजारांविरोधात लढण्यास शक्ती मिळते.

3. लिंबूमध्ये अॅन्टीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम आणि लोह असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते. यामुळे सर्दी-खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून लहान मुलं दूर राहतात.

4. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन असतं. शिवाय, यातील पोषक तत्त्वं प्रोटीनची कमतरताही भरपूर काढतात. यामुळे मेटाबॉल्जिमचा स्तरही योग्य प्रमाणात राहतो. गाजराच्या सेवनामुळे मुलांमध्ये उत्साह कायम टिकून राहतो.

5. जांभळाच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासोबतच पचनक्रियादेखील चांगली राहते. यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होत नाही.

6. लहान मुलांच्या आहारात जवाचा समावेश करावा. यामध्ये अँटी-बॅक्टीरिअल आणि अँटीऑक्सिडेंट्सचे गुण असतात.

7. रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याचे मुख्य कारण म्हणजे झिंकची कमतरता. चण्याच्या सेवनामुळे झिंकची कमतरता भरुन निघते.

8. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी आणि अँटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असते. मशरूम लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात.

9. रताळे उकडून लहान मुलांना खायला द्यावे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल आणि मुलं आजारांपासून दूर राहतील.