लहान मुलांना खेळणी-कपड्यांऐवजी या गोष्टी करा गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:11 PM2018-09-06T16:11:24+5:302018-09-06T16:19:34+5:30

हसरी-खेळणारी मुलं कोणाला नाही आवडत. लहान मुलांच्या नाकावर राग येवो किंवा त्यांचा वाढदिवस असो, अनेकदा आपण त्यांना गिफ्ट्स देत असतो. गिफ्टमध्ये एखादं खेळणं, कपडे किंवा त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट ठरलेलीच असते. मात्र, खेळणं, गेम्सव्यतिरिक्त लहान मुलांना अशी काही तरी गोष्ट गिफ्ट करा, जे त्यांचे ज्ञान वाढवण्यास उपयोगी होतील. 1. ज्ञानात भर पाडणारं गिफ्ट : आपल्या मुलानं काही तरी चांगल्या गोष्टीचे ज्ञान संपादित करावे असे वाटत असल्या खेळण्यांव्यतिरिक्त संग्रहालय, विज्ञान प्रदर्शन यांसारख्या उपक्रमांना भेट द्यावी आणि नव-नवीन गोष्टी त्यांना शिकवाव्यात. एखादं ट्रेक किंवा पिकनिकचे आयोजन करावे. नव-नवीन गोष्टी पाहून मुलंदेखील खूश होतील आणि त्यांचे ज्ञानही वाढण्यास मदत होईल.

2. रोपटे गिफ्ट करा : लहान मुलांना एखादे रोपटे किंवा झाड गिफ्ट म्हणून दिल्यास पर्यावरणाप्रति त्यांची जागरुकता वाढेल. गिफ्ट केलेले रोपटे घराच्या बालकनीमध्ये लावून त्याची देखभाल करण्यास मुलांना सांगावे.

3. आवडत्या छंदानुसार द्या गिफ्ट : मुलांना नेहमी त्यांच्या आवडत्या छंदानुसार गिफ्ट करावं. जर मुलांना चित्रकला, संगीताची आवड असल्यास त्यांना खेळण्याऐवजी रंगपेटी, चित्रकलेचे कागद, गिटार, माउथ ऑर्गन इत्यादी गोष्टी गिफ्ट कराव्यात. यामुळे त्यांचे कलाकौशल्य वाढवण्यासही मदत होते.

4. आठवणींची साठवण : लहानपणीच्या आठवणी नेहमी ताज्या ठेवण्यासाठी त्यांना एक फोटो अल्बम जरुर गिफ्ट करावा. यामध्ये नवीन-जुने फोटो लावून आठवणींची साठवण करायला त्यांना शिकवावे. मुलं मोठी झाल्यानंतर लहानपणीच्या आठवणी पाहून त्यांना नक्कीच आनंद होईल.