these values to teach your child
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 04:13 PM2019-03-13T16:13:04+5:302019-03-13T16:34:40+5:30Join usJoin usNext पालकांना आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता असते. मुलांना समजून घेणं आणि त्यांना समजावणं फार कठीण काम असतं. चिमुकल्यांच्या मनात कधी काय येईल आणि कधी ते कोणत्या गोष्टीचा हट्ट धरतील याचा काही नेम नाही. मुलांना स्मार्ट आणि इंटेलिजेंट करण्यासाठी पालक नेहमीच तत्पर असतात. लहाणपणीच मुलांना चांगल्या सवयी लावणं अत्यंत गरजेचं असतं. चांगल्या सवयी या मुलांना त्यांच्या भविष्यात उपयोगी ठरतात. तसेच मुलांना सर्व गोष्टीची माहिती मिळते. चांगल्या-वाईट गोष्टी समजण्यास मदत होते. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फायदेशीर ठरणाऱ्या गोष्टींबाबत जाणून घेऊया. प्रयत्नांती परमेश्वर हे शिकवा लहान मुलांना सर्व गोष्टी लगेचच हव्या असतात. खेळणी आणि इतर गोष्टींसाठी त्यांचा हट्ट असतो. मात्र त्यांना काही वेळ पाहायला सांगा. योग्य वेळ आल्यानंतर हव्या असलेल्या वस्तू द्या. तसेच एखादी वाईट गोष्ट झाली तर मुलं लगेच निराश होतात. तेव्हा त्यांची समजूत काढा आणि हव्या असलेल्या गोष्टीबाबत प्रयत्न करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन द्या. प्रयत्न केल्यावर योग्य ते यश मिळेल हे पटवून द्या. थँक्यू आणि सॉरी म्हणायला शिकवा एखादी चूक झाली की क्षमा मागण्यासाठी सॉरी हा शब्द वापरला जातो. शुभेच्छा मिळाल्यावर आवर्जून थँक्यू म्हटलं जातं. लहान मुलांना ही थँक्यू आणि सॉरी या दोन्ही शब्दांचे अर्थ सांगून ते बोलायला शिकवा. यामुळे मुलांमध्ये दुसऱ्या व्यक्तींबाबत सन्मानाची भावना विकसित होईल. तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे ऐकण्याचा सल्ला द्या. प्रामाणिकपणा शिकवा मुलांना प्रामाणिकपणा शिकवणं हे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्या हातून एखादी चूक झाली तर ती मान्य करायला शिकवा. तसेच सॉरी बोलण्याचे महत्त्व पटवून द्या. प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचा कसा फायदा होतो हे मुलांना समजून सांगा. मदत करायला शिकवा एखादी व्यक्ती संकटात असेल तर त्याची मदत करण्याची शिकवण मुलांना द्या. तसेच मदतीसाठी तत्पर असणं किती गरजेचे असते याची माहिती द्या. लहान मुलं आपली एखादी वस्तू पटकन दुसऱ्यासोबत शेअर करत नाही. त्यावेळी त्यांना शेअरींगचं महत्त्व सांगा. व्यक्त व्हायला शिकवा अति संवेदनशील मुलं बऱ्याचदा सोशल फोबियाची शिकार होतात. त्यामुळे त्यांना बाहेर फिरायला घेऊन जा. दुसऱ्या मुलांसोबत वेळ घालवल्यामुळे त्यांच्या स्वभावामध्ये परिवर्तन येऊ शकतं. त्यांना नवीन लोकांसोबत ओळख करून द्या. त्यांना घराबाहेर घेवून जात असाल तर त्यासाठी त्यांना मानसिकरित्या तयार करा. मुलांना व्यक्त व्हायला शिकवा. त्यांना त्यांचे विचार मोकळेपणाने मांडायला सांगा. सकारात्मक विचार करायला शिकवा लहान मुलं खूप हुशार असल्याने अनेक गोष्टींचं निरीक्षण करत असतात. घरामध्ये नकारात्मक अथवा हिंसक गोष्टी ठेवू नका. सकारात्मक विचार करायला शिकवा. सकारात्मक वातावरण हे मुलांच्या वाढीसाठी पोषक असतं. मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करा. तसेच विविध स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रोत्साहन द्या. स्मार्टफोन-लॅपटॉपचा योग्य वापर करायला शिकवा लहान मुलांना स्मार्टफोन आणि व्हिडीओ गेमपासून लांब ठेवा. सततच्या स्मार्टफोनच्या वापरामुळे त्यांच्या डोळ्यांवर त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे स्मार्टफोनपासून योग्य वापर करायला शिकवा. महत्त्वाची माहिती शोधण्यासाठी स्मार्टफोनचा कसा वापर केला जातो याची माहिती द्या. टॅग्स :पालकत्वParenting Tips