tips for improving children reading habit
मुलांचं अभ्यासात मन लागत नाही?, जाणून घ्या या टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:15 PM2018-10-30T15:15:22+5:302018-10-30T15:22:40+5:30Join usJoin usNext 1. पुस्तकांसोबत मैत्री करायला शिकवा : मुलं लहान असतानाच त्यांच्यामध्ये पुस्तकांसंबंधी आवड निर्माण करावी. जेव्हा मुलं 2 ते 3 वर्षांचे होतील, तेव्हा त्यांची पुस्तकांसोबत मैत्री करुन द्यावी. मुलांना पुस्तकांची गोडी लागावी, यासाठी पालकांनी लहानपणापासून त्यांच्यासोबत बसून पुस्तक वाचायची सवय लावावी. या उपायामुळे मोठेपणी अभ्यासाची पुस्तकं वाचताना आपली मुलं कंटाळा करणार नाहीत. 2. गोष्टींच्या माध्यमातून करा आकर्षित : काही पालकांना आपल्या मुलाला पुरेसा वेळ देणं कठीण जातं. पण मुलांसाठी वेळ काढणं फारच महत्त्वाचे आहे. त्यांच्यात अभ्यासाची गोंडी निर्माण व्हावी, यासाठी मुलांना सुरुवातीस निरनिराळ्या गोष्टी सांगून आकर्षित करावे. यानंतर हळूहळू मुलांना पुस्तकातील गोष्टी वाचण्यासाठी सवय लावावी. 3. मुलांच्या आवडीनिवडीही जाणून घ्या : जोपर्यंत एखादं पुस्तक मुलांना समजत नाही, त्याचे आकलन होत नाही. तोपर्यंत त्यांना ते पुस्तक वाचून दाखवावे. कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचण्याची त्यांची रुची आहे, हेदेखील जाणून घ्या. 4. वाचनाची गोडी लावावी : आई-वडील क्वचितच आपल्या मुलांना वाचनाची सवय लावतात. पण असे करू नये. त्यांना नियमित किमान अर्धा तास तरी वाचनाची सवय लावावी. याचा त्यांना भविष्यात प्रचंड फायदा होईलयटॅग्स :शिक्षणEducation