your mom told you these things when you were kid do you remember
आईनं लहानपणी केलेल्या 'या' सूचना, आठवणीत आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:02 PM2019-02-16T19:02:21+5:302019-02-16T19:08:51+5:30Join usJoin usNext 1.त्या मित्र/मैत्रिणीपासून दूर राहा आपल्या आयुष्यात एकतरी अशी मैत्रिणी किंवा मित्र असतो, जो आपल्या आईला कधीच आवडत नाही. विशेषतः ही मित्रमंडळी जेव्हा आपल्या अगदी जवळ असतात. एखादी व्यक्ती आपल्या किती जवळची असली तरीही तिच्या/त्याच्या मनात आपल्यासाठी चांगलेच विचार असतील, हे गरजेचं नाही, याची आईला अगदी व्यवस्थित माहिती असते. कित्येकदा मित्रमैत्रिणींचा स्वभाव वाईट आहे की चांगला? याची माहिती आपल्या आधीच आईला समजते. यामुळे आई जे काही सल्ले देते त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य तो विचार करावा. 2. 'पाच वर्षांनंतर तुला या गोष्टीवर हसू येईल' हे ऐकून कादचित तुम्हाला विचित्र वाटेल,पण कुठे-ना-कुठे तरी आईला आपले भविष्य दिसत असते. पण तिनं स्वतःदेखील आयुष्यात तुमच्यासारखे अनुभव घेतले असतील. किशोरवयात असताना आपणा सर्वांचे मन अतिशय नाजूक असते आणि छोट्या-मोठ्या गोष्टींवर आपण अनेकदा दुखावले जातो. अशा वेळेस आई आपल्याला समजावते की,'5 वर्षांनंतर तुला या गोष्टीवर खूप हसू येईल'. काही वर्षानंतर तुम्हाला या अनुभवदेखील येतो.3. 'बचत करणे गरजेचं' पहिला जॉब मिळाल्यानंतर बहुतांश लोकांना पैशांच्या बचतीबाबत कोणतीच कल्पना नसते. आपण वायफळ गोष्टींवर खर्च करत राहतो आणि गरज नसतानाही काही गोष्टी विकत घेतो. आवश्यकता नसताना पैसे खर्च करण्याच्या सवयीमुळे महिन्याच्या मध्येच पैसे संपतात आणि महिना अखेरपर्यंत आपल्याला दिवस रडतखडत काढावे लागतात. अशा वेळेस आपल्याला बचतीसंदर्भात आईने दिलेल्या सल्ल्यांची प्रकर्षाने आठवण येते. 4. संयम माणसाला आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतो रागाच्या भरात आपण कित्येक नको-नको ती विधानं करुन मोकळे होतो. अनेकदा आपल्या बोलण्यामुळे बऱ्याच जणांनी मने दुखावली जातात. तरीही कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी बहुतांशवेळा आपण विचार करत नाही. सहनशीलतेचा अभाव असल्यामुळे लोक कोणतीही गोष्ट समजण्यापूर्वीच आक्रमक होतात. अशा वेळेस आई आपल्याला वारंवार सांगते की कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यापूर्वी शांतपणे विचार करावा आणि त्यानंतरच गरज असल्यास बोलावे. 5. आईचे प्रेम निस्वार्थी आईसोबत आपण अनेकदा वादावादी- भांडण करतो. रागाच्या भरात आपण आईला काहीही बोलतो, तिचं मन दुखावतो. पण तुमचे कोणतेही बोलने ती मनात ठेवत नाही, उलट तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतच राहते. टॅग्स :पालकत्वParenting Tips