लग्नसराईसाठी शिवून घ्या खास आरी वर्कचे ब्लाऊज; १० नवीन डिजाइन्स, कोणतीही साडी शोभून दिसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:29 PM2024-11-19T16:29:50+5:302024-11-19T18:44:26+5:30

10 Aari Works Ideas :लग्नासारख्या खास प्रसंगांना आजकाज आरी वर्क केलेले ब्लाऊज मोठ्या प्रमाणात घातले जातात. (Aari Work Blouse )

तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईला सुरूवात होते. लग्नासाठी, साखरपुडा किंवा कोणत्याही खास प्रसंगांसाठी महिला मोठ्या प्रमाणात साड्या विकत घेतात. साड्यांप्रमाणे ब्लाऊजचे ही नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहेत. (Aari Work Blouse For Wedding)

लग्नासारख्या खास प्रसंगांना आजकाज आरी वर्क केलेले ब्लाऊज मोठ्या प्रमाणात घातले जातात. (Aari Work Blouse )

आरी वर्क केलेले ब्लाऊज १८०० रूपयांपासून ते ५०००, ६००० अशा किंमतीत बनवून मिळतात.

ब्लाऊज शिवण्याआधी तुम्हाला ते ब्लाऊज आरी वर्क करण्यासाठी द्यावं लागेल. ब्लाऊजवर हवी तशी डिजाईन बनवल्यानंतर तुम्ही आपलं माप देऊन ब्लाऊज शिवू शकता.

या डिजाईन्समध्ये मशिन वर्क आणि हॅण्ड वर्क असे दोन पॅटर्न्स असतात. मशिन वर्कच्या तुलनेत हॅण्ड वर्कसाठी जास्त खर्च येतो. पण मशिनवर केलेले कामाचा फारसा आकर्षक लूक येत नाही. जर तुम्ही कधीतरीच हे ब्लाऊज शिवणार असाल तर त्यावर हॅण्ड वर्क करून घेऊ शकता.

डोहाळ जेवण, लग्न, साखरपुडा, या कार्यक्रमांसाठी तुम्ही सुंदर डिजाईन्स बनवून घेऊ शकता.

ब्लाऊजच्या मागे नेट लावून त्यावर तुम्ही नवऱ्याचे नाव, जसं की .... ची नवरी, मी आई होणार.... असं डिजाईन बनवू शकता.

ब्लाऊजच्या हातांना तुम्ही घुंगरूची लेस लावू शकता किंवा आकर्षक गोंडे मागच्या बाजूला लावू शकता.

जर तुम्हाला बलून स्टाईल हात हवे असतील तर त्यावरही आरी वर्क करून मिळेल.

(Image Credit - Social Media)