रोज वापरण्यासाठी १ ग्रॅम मंगळसूत्राचे १० नाजूक डिजाईन्स; कमी बजेटमध्ये सुंदर आकर्षक दागिना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 03:31 PM2024-08-14T15:31:51+5:302024-08-14T18:05:28+5:30

Latest Mangalsutra Designs : आर्टिफिशियल दागिने वापरण्यापेक्षा आपल्याला हव्या त्या डिजाईनचे मंगळसुत्र तुम्ही सोन्यात बनवू शकता.

मंगळसुत्र हा दागिना सौभाग्याचा अलंकार आहे. विवाहित स्त्रियांचे मंगळसुत्राशी एक वेगळेच नाते असते. रोजच्या वापरासाठी ऑफिसला जाण्यासाठी तसंच घरात वापरण्यासाठी मंगलसुत्राच्या नाजूक डिजाईन्स उत्तम असतात. मंगळसुत्राचे नवीन पॅटर्न्स तुम्ही १ ते २ ग्रॅन सोन्यात बनवू घेऊ शकता. या डिजाईन्सचा स्टायलिश लूक तुम्हाला फार आवडेल.

आर्टिफिशियल दागिने वापरण्यापेक्षा आपल्याला हव्या त्या डिजाईनचे मंगळसुत्र तुम्ही सोन्यात बनवू शकता. आर्टिफिशयल ज्वेलरीच्या दुकानात तुम्हाला साधे या पॅटर्नचे मंगळसुत्र मिळतील.

जर तुम्हाला फार जड दागिने आवडत नसतील तर तुम्ही या प्रकारची मंगळसुत्र रोज वापरू शकता.

टिपिकल वाटी किंवा पानाचं पेंडंट न घेता तुम्ही हार्ट शेप, पार्टनरच्या नावाचं सुरूवातीचं अक्षर किंवा खड्यांचा सर्कल मध्येभागी ठेवू शकता.

या मंगळसुत्रात गोल्डन मण्यांबरोबरच काळेमणीसुद्धा आकर्षक डिजाईन केलेले असतात.

जर तुम्हाला थोडं जाड मंगळसुत्र हवं असेल तर हा उत्तम पर्याय आहे. पेटंडटच्या ठिकाणी एक गोल मणी घाला.

अशी मंगळसुत्रांच्या युनिक डिजाईन्स तुम्हाला कॅरेटलेटमध्ये किंवा प्रवेश गोल्डमध्ये सहज मिळतील.

ही मंगळसुत्र टिकायलाही खूप चांगली असतात. नाजूक आहेत त्यामुळे लगेच तुटतात असं नाही.

मंगळसुत्रात तुम्ही आवडीनुसार वेगवेगळे स्टोन्स लावू शकता.

(Image Credit- Social Media)