साडी नेसल्यावर शोभून दिसणाऱ्या १० हेअरस्टाईल, मिळेल एकदम क्लासी आणि स्मार्ट लूक- बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2022 06:26 PM2022-07-05T18:26:57+5:302022-07-05T18:32:48+5:30

१. लग्नकार्यात किंवा मग एखाद्या छोटेखानी समारंभात साडी नेसल्यावर कशी हेअरस्टाईल करावी, हेच कळत नाही. त्यासाठीच तर बघा या काही खास टिप्स आणि साडीवर करा एकदम क्लासी हेअरस्टाईल.

२. वेणी घालायचं ठरवलं असेल तर अशी स्टायलिश वन साईडेड वेणी घाला आणि तिला अशा पद्धतीची आर्टिफिशियल हेअर ज्वेलरी लावून डेकोरेट करा.

३. मोकळे केस सोडणार असाल तर पुढच्या बाजूने अशी हेअरस्टाईल करून मागचे केस मोकळे राहू द्या. यामुळे तुमचा पुढचा लूक अधिक आकर्षक दिसेल.

४. कधी कधी आपण खूपच गडबडीत असतो. त्यामुळे मग हेअरस्टाईल करायला खूप वेळ मिळत नाही. अशा वेळी असे वन साईडेड केस पिनअप करा. मागच्या बाजूने छोटासा पफ काढा आणि बाकी केस मोकळे सोडा. मस्त दिसाल.

५. केस छोटे असतील, तर अशा पद्धतीची हेअरस्टाईल छान सुट होऊ शकेल.

६. एखाद्या फॉर्मल कार्यक्रमासाठी तयार होत असाल तर फॉर्मल साडीवर अशा पद्धतीचा हाय पोनीटेल घालू शकता.

७. तसेच जर एखाद्या रिसेप्शनसाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी डिझायनर साडी नेसणार असाल तर अशा पद्धतीचा पोनीटेल अधिक शोभून दिसेल.

८. नातलगाच्या, मित्रमंडळींच्या लग्नासाठी तयार होताना साधारणपणे आपण ट्रॅडिशनल ड्रेसिंग आणि हेअरस्टाईल करतो. त्यामुळे अशा पद्धतीची एखादी हेअरस्टाईल त्याप्रसंगी छान दिसेल.

९. समोरून पफ आणि मागे वन साईड वेणी ही हेअरस्टाईल डिझायनर तसेच पारंपरिक काठपदर अशा दोन्ही साड्यांवर छान दिसेल.

१०. थोडासा मॉडर्न लूक हवा असेल तर अशा पद्धतीचा बन आणि त्यावर साजेशी एक्सेसरीज ट्रेण्डी दिसेल.