10 Simple, trendy and stylish mehendi heena designs for Ramdan Eid and marriage functions
Stylish Mehendi Designs: मेहेंदी है रचनेवाली... मेहेंदी लावायला आवडते, बघा १० सुंदर डिझाइन्स.. हातावर दहा मिनिटांत सुंदर नक्षी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 07:24 PM2022-04-27T19:24:21+5:302022-04-27T19:29:03+5:30Join usJoin usNext १. ईद आणि लग्नसराई या दोन्ही कारणांमुळे सध्या बाजारात भरपूर गर्दी आहे. शॉपिंगला जसे उधाण आले आहे, तशीच जबरदस्त तयारी आता मेहेंदीचीही सुरू आहे. २. म्हणूनच तर या दोन्ही कारणांमुळे हातावर मेहेंदी काढणार असाल तर या काही लेटेस्ट डिझाईन्स एकदा नक्की बघा.. ३. आजकाल हात भरून मेहेंदी काढण्याचा ट्रेण्ड कमी होत आहे. खुद्द आलिया भटनेही तिच्या लग्नात साधी- सुटसुटीत मेहेंदी काढली होती. तुम्हालाही जर अशा पद्धतीचे डिझाईन्स आवडत असतील तर हे बघा त्याचंच एक उत्तम कलेक्शन. ४. ईद आणि लग्नसराई या दोन्ही गोष्टी म्हणजे भरपूर धावपळ. म्हणूनच तर मेहेंदी काढायला खूप वेळ नसेल तर या डिझाईन्स तुम्ही नक्की काढू शकता. ५. अतिशय कमी वेळात अशा प्रकारची मेहेंदी काढून होते आणि रंगल्यावर ती खूपच छान दिसते. ६. आपल्या घरचं कार्य होऊन गेल्यावर मेहेंदी पुढचे ५- ६ दिवस तरी हातावर तशीच असते. अशावेळी जर भरगच्च मेहेंदी असणाऱ्या हातांनी ऑफिसला जावं लागलं तर खूपच ऑकवर्ड वाटतं. म्हणूनच अशा वेळी या काही डिझाईन्स निवडून बघा.. ७. मेहेंदीच्या या डिझाईन्स काढण्यासाठी तुम्ही त्यात खूप पारंगत असावं, असं मुळीच नाही. अगदी सहज तुम्हाला अशी साधी- सोपी डिझाईन् काढता येईल. ८. मेहेंदी लावण्यापुर्वी हात एकदा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यावर खोबरेल तेल लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी मेहेंदी काढा. ९. मेहेंदी सुकल्यानंतर काढून टाकली तरी चालेल फक्त पुढचे ४ ते ५ तास हात पाण्यात घालू नका. १०. अशी सुंदर मेहेंदी जेव्हा छान रंग धरेल तेव्हा नक्कीच इतरांपेक्षा तुमच्या मेहेंदीचं डिझाईन अधिक उठून दिसेल. टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनलग्नBeauty Tipsfashionmarriage