4 easy tricks to make your curry leaf plant more healthy and grow faster
कडिपत्ता चांगला वाढतच नाही? ४ सोपे घरगुती उपाय, काही दिवसांतच होईल डेरेदार- हिरवागार... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 09:07 AM2024-05-24T09:07:39+5:302024-05-24T09:10:01+5:30Join usJoin usNext कडिपत्ता आपल्या स्वयंपाकात नेहमीच लागतो. शिवाय तो त्वचेसाठी, केसांसाठी, आरोग्यासाठीही अतिशय उत्तम आहे. त्यामुळे आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत आपण त्याचं छोटंसं का होईना पण रोप लावतोच. आता बऱ्याचदा असं होतं की आपला कुंडीतला कडिपत्ता चांगला वाढतच नाही. त्याला ऊन, पाणी, खत वेळेवर दिलं तरी त्याची वाढ होत नाही. असं तुमच्याही कडिपत्त्याच्या बाबतीत होत असेल तर हे काही घरगुती उपाय करून पाहा. यामुळे मातीची गुणवत्ता सुधारेल आणि कडिपत्त्याची चांगली वाढ होईल. १५ दिवसांतून एकदा कडिपत्त्याच्या झाडावर नीम ऑईलचं सोल्यूशन टाका. यासाठी साधारण २ चमचे नीम ऑईल एक लीटर पाण्यात मिसळावे आणि ते पाणी रोपावर शिंपडावे. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे केळीचे साल ८ ते १० तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि कडिपत्त्याला टाका. यामुळे रोपाची मुळं पक्की होऊन त्याची चांगली वाढ होण्यास मदत होईल. वापरून झालेली चहाची पावडर, कॉफी कडिपत्त्याच्या कुंडीतल्या मातीमध्ये टाका. हे झाडांसाठी खूप चांगलं खत आहे. इप्सम सॉल्ट म्हणजेच मॅग्नेशियम सल्फेट पाण्यात मिसळून मातीमध्ये टाका आणि पानांवरही शिंपडा. रोप छान हिरवेगार होईल. टॅग्स :बागकाम टिप्सहोम रेमेडीगच्चीतली बागGardening TipsHome remedyTerrace Garden