उन्हाळ्यात कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढला? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगतेय खास उपाय- पोट होईल साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 11:09 AM2024-05-17T11:09:05+5:302024-05-17T11:14:47+5:30

उन्हाळ्यात जेवण न जाणे, अपचन होणे, डिहायड्रेशन होणे असा त्रास अनेकांना होतो. त्यामुळे मग अशा लोकांना उन्हाळ्याच्या दिवसांत कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो आणि रोजच पोट साफ व्हायला अडचणी येतात.

म्हणूनच तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी काय उपाय करावेत, याविषयीचा एका व्हिडिओ सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी नियमितपणे काही व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे.

हे व्यायाम केल्यामुळे आतड्यांचा तसेच पचन संस्थेशी संबंधित अवयवांचा व्यायाम होईल, तिथले स्नायू लवचिक होण्यास मदत होईल आणि त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल, असं अंशुका सांगतात.

त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम आहे मलासन. यामुळे पोट साफ होण्यास नक्कीच मदत होईल.

दुसरा व्यायाम आहे पवन मुक्तासन. यामुळे पोट साफ तर होईलच, पण ॲसिडीटी, अपचन असे त्रासही कमी होतील. तसेच ज्यांना वारंवार गॅसेसचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हा व्यायाम विशेष फायदेशीर आहे.

तिसरा व्यायाम आहे अर्ध मत्स्येंद्रासन. यामुळे पचन संस्थेशी संबंधित अवयवांचा चांगला व्यायाम होतो. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजुंनी हा व्यायाम ३ ते ५ मिनिटांसाठी करावा.

चौथा व्यायाम आहे विपरीत करणी. हा व्यायाम करण्यासाठी भिंतीच्या जवळ जमिनीला पाठ टेकवून झोपा. त्यानंतर दोन्ही पाय भिंतीवर एका सरळ रेषेत लावा. दोही हात खांद्याला समांतर जमिनीवर पसरवून ठेवा. हा व्यायामही ३ ते ५ मिनिटे करावा.