4 juices to increase iron level, food that helps to increase hemoglobin, iron rich food and fruits
हिमोग्लोबिन वाढतच नाही? ४ गारेगार ज्यूस प्या, अशक्तपणा जाईल- अंगातलं रक्त वाढून ताकद येईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2024 09:18 AM2024-05-09T09:18:07+5:302024-05-09T09:20:01+5:30Join usJoin usNext हिमोग्लोबिन कमी असण्याची तक्रार बहुतांश महिलांमध्ये आढळून येते. शरीरातलं लोह कमी झालं असेल तर अंगात ताकद राहात नाही. अशक्तपणा येतो. थोडी मेहनत झाली तरी लगेच गळून गेल्यासारखं होतं. म्हणूनच लोह किंवा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काही पदार्थ आवर्जून आहारात घेतले पाहिजेत. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे मग नेहमीच थंडगार काहीतरी पिण्याची इच्छा होते. खरंतर जेवणापेक्षा सरबत, ज्यूस, ताक प्यावं असंच वाटतं. याच संधीचा फायदा घ्या आणि भरपूर लोह देणारे हे काही गारेगार ज्यूस किंवा सरबत उन्हाळ्यात नियमितपणे प्या... काही दिवसांतच हिमोग्लोबिनमध्ये खूप चांगली वाढ दिसून येईल. यापैकी सगळ्यात पहिला ज्यूस किंवा सरबत आहे ते बीटरूटचं. बीटमध्ये लोहसोबतच फोलेट, मँगनीज, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बेटाईन भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तपेशींशी ऑक्सिजन शोषून घेण्याची क्षमता वाढते. काळ्या मनुका म्हणजेच prunes अतिशय आरोग्यदायी असतात. एक कप भर जरी तुम्ही काळ्या मनुकांचा ज्यूस घेला तरी त्यातून तुम्हाला २.८ एमजी एवढं लोह मिळतं. काळ्या मनुका पाण्यामध्ये ७ ते ८ तास भिजवून तुम्ही हा ज्यूस करू शकता. पुदिन्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात लोह असतं. जर तुम्ही १०० ग्रॅम पुदिन्याची पानं घेतली तर त्यातून तुम्हाला १६ मिलीग्रॅम एवढं लोह मिळू शकतं. तुमच्या आवडीचे पदार्थ घालून तुम्ही या पुदिन्याच्या ज्यूसला अधिक चटपटीतही करू शकता. खजूराचा मिल्कशेक करून प्यायल्यानेही तुम्हाला भरपूर लोह मिळेल. यामध्ये तुम्ही बदाम, काजू, तीळ असा इतर सुकामेवाही टाकू शकता.टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्नWeight Loss TipsHealthHealth Tipsfood