सावळा गं रंग.. शोभून दिसतील ‘या’ रंगाचे कपडे, खुलून दिसतील आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2025 15:51 IST2025-04-04T09:25:58+5:302025-04-04T15:51:48+5:30

गोरा, गव्हाळ, सावळा अशा प्रत्येक वर्णाला वेगवेगळ्या रंगाचे कपडे शोभून दिसतात. त्यामुळेच आता सावळा वर्ण असेल तर कोणत्या रंगाचे कपडे त्यांच्या अंगावर अधिक आकर्षक वाटू शकतील ते पाहूया..

सगळ्यात पहिलं म्हणजे डिप रेट किंवा ब्लॅकिश रेड, मरून या रंगाचे कपडे घातल्यावर सावळा वर्ण आणखी उठून दिसतो.

मस्टर्ड यलो रंगाचे कपडे घातल्यावर त्या रंगाचं खूप छान रिफ्लेक्शन चेहऱ्यावर येतं आणि चेहरा छान तजेलदार दिसतो.

डार्क ग्रीन रंगाचे कपडे घातल्यानंतर सावळ्या रंगाच्या व्यक्ती अधिक उजळ दिसू लागतात.

मजेंटा रंग सुद्धा सावळ्या रंगाच्या व्यक्तींच्या अंगावर खूप उठून दिसतो.

रॉयल ब्लू हा एक असा रंग आहे जाे जवळपास सगळ्यांनाच छान दिसतो. त्यामुळे सावळ्या व्यक्तींनीही रॉयल ब्लू रंगाचे कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे..