कमी वयातच गुडघे दुखतात, पाठ- कंबर गळाली? कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ खा, हाडांचं दुखणं पळून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 09:30 IST2025-02-27T09:24:49+5:302025-02-27T09:30:01+5:30

पुर्वी ठराविक वय झाल्यानंतरच पाठ, कंबर, गुडघे दुखायला लागायचे. पण आता मात्र कमी वयातच हे सगळे त्रास सुरू झाले आहेत.

यामागे असणारी काही महत्त्वाची कारणं म्हणजे आहार व्यवस्थित नसणे, व्यायाम न करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात घराबाहेर न गेल्याने व्हिटॅमिन डी न मिळणे.. म्हणूनच असं कमी वयात सुरू झालेलं हाडांचं दुखणं थांबवायचं असेल तर तुमच्या आहारात काही पदार्थ नियमितपणे असायलाच हवेत.

त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे मखाना. मखानामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी मखाना उपयुक्त आहे.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. मुलांना जर दूध प्यायला आवडत नसेल तर त्यांना दही, पनीर, चीज असे दुग्धजन्य पदार्थ योग्य प्रमाणात खाऊ घाला.

तिळांमधूनही कॅल्शियम चांगल्या प्रमाणात मिळते. त्यासोबतच त्यातून प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई सुद्धा मिळते. त्यामुळे दिवसातून एकदा चमचाभर काळे किंवा पांढरे तीळ खावेत.

अक्रोड, बदाम या पदार्थांमधूनही कॅल्शियम मिळते. दिवसाच्या सुरुवातीलाच भिजवलेले बदाम आणि अक्रोड खाणं अधिक उत्तम मानलं जातं.

राजमा, काबुली चणे, हरबरे हे सुद्धा कॅल्शियम आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात देतात.