मुलांना दूध आवडत नाही? ५ पदार्थ खाऊ घाला- दूध न पिताही मुलांची हाडं होतील मजबूत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 03:40 PM2024-08-16T15:40:09+5:302024-08-16T17:20:40+5:30

Calcium Rich Foods For Children To Make Bones Strong :

मुलांच्या विकासात त्यांची हाडं खूप महत्वाची असतात. मजबूत हाडं फक्त मुलांना सक्रिय ठेवत नाहीत तर त्यांच्यासह संपूर्ण आरोग्यासाठीही गरजेचे असतात. यासाठी आहारात अशा पदार्थांचा समावेश करावा ज्यामुळे तब्येत चांगली राहण्यास मदत होते. ५ पदार्थांचा आहारात समावेश केल्यास मुलांना भरपूर कॅल्शियम मिळेल. अनेक मुलं दूध प्यायला नाक मुरडतात, अशावेळी मुलांच्या आहारात दुधाऐवजी इतर पदार्थांचा समावेश केला तर हाडं चांगली राहण्यास मदत होईल.

पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटामीन के मोठ्या प्रमाणात असते. व्हिटामीन के हाडांना मजबूत बनवण्यास मदत करते.

बदामात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटीन यांसारखे पोषक तत्व असतात जी हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाची असतात.

संत्री, लिंबू आणि मोसंबी यांसारखी आंबट फळं व्हिटामीन सी ने परिपूर्ण असतात. ज्यामुळे कोलेजेन उत्पादन वाढते, हाडं चांगली राहण्यास मदत होते.

सोयाबीन आणि सोया पनीर यांसारखी उत्पादनं कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहेत. ज्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

मुलांना गूळ आणि शेंगदाणे खायला देऊ शकता. हे खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही आणि कॅल्शियमचे प्रमाणही वाढते.