वजन वाढू नये यासाठी ५ सवयी स्वत:ला लावून घ्या- बॉडी होईल डिटॉक्स- वाचा आहारतज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 03:26 PM2023-11-22T15:26:41+5:302023-11-22T15:32:16+5:30

वाढतं वजन ही बहुसंख्य लाेकांसमोरची समस्या. कारण हल्ली आपली लाईफस्टाईल पुर्णपणे बदलून गेली आहे. कामाच्या पद्धती आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये खूप बदल झाला आहे.

त्यामुळेच शरीर नॅचरली डिटॉक्स करण्यासाठी आणि वजन वाढू नये यासाठी कोणत्या सवयी स्वत:ला लावून घेणं गरजेचं आहे, याविषयीची एक पोस्ट सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी सांगितलेले Detox mantra तुम्ही अगदी पाठ करून टाका आणि रोज त्याचा अवलंब करा. जेणेकरून वजन कमी करण्यासाठीही भरपूर मदत होईल.

यापैकी त्यांनी सांगितलेला पहिला मंत्र म्हणजे व्यायामासाठी तुमच्यासोयीची कोणतीही वेळ फायद्याचीच असते. त्यामुळे तुम्हाला जमेल त्या वेळी जमेल तो व्यायाम करा... तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे.

विकतचे पदार्थ खाणं कमी करा. घरच्याघरी रोज स्वयंपाक करून जेवा.

स्क्रिन टाईम कमी करा आणि रात्री लवकर झोपा.

सकाळी लवकर उठा आणि तुमचा दिवस लवकरात लवकर सुरू करा.

प्रसिद्धी मिळविण्यासाठी हॅशटॅग असतात. पण आरोग्य मिळविण्यासाठी असे कोणतेही हॅशटॅग किंवा शॉर्टकट नसतात...ऋजुता यांनी सांगितलेले हे ५ मंत्र जर लक्षात ठेवले तर नक्कीच उत्तम आरोग्य राखता येईल.