5 food items rich in calcium, calcium rich food, calcium rich food other than milk and dairy product
कॅल्शियमचा सुपरडोस असणारे ५ चटपटीत पदार्थ, मुलंही आवडीने खातील- हाडं दणकट होतील By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 01:34 PM2024-04-24T13:34:03+5:302024-04-24T13:55:58+5:30Join usJoin usNext हाडं, दात यांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमची अतिशय गरज असते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे नखंही तुटतात, केस गळू लागतात. एकंदरीतच आरोग्यावर परिणाम होतो. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण बऱ्याचदा लहान मुलं हे पदार्थ खायचा कंटाळा करतात. किंवा आपल्यालाही तेच ते पदार्थ नियमितपणे खायला नको वाटते. म्हणूनच चवीत बदल म्हणून हे काही पदार्थ करा. हे चटपटीत पदार्थ सगळे जण आवडीने तर खातीलच पण त्यातून अगदी खच्चून कॅल्शियम मिळेल. शरीरातली कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी हे पदार्थ नक्कीच मदत करतील. यातला पहिला पदार्थ आहे पनीर. पनीरचे चवदार पराठे, पनीर फ्राय करून देणे, किंवा भरपूर पनीर घालून एखादी भाजी करणे, असं केलं तर मुलांच्या पोटात पनीरच्या माध्यमातून भरपूर कॅल्शियम जाईल. 'राजमा चावल' हा एक उत्तम पदार्थ आहे. राजमा थोडा चटपटीत, चवदार करा. सगळेच आवडीने खातील आणि भरपूर कॅल्शियमही मिळेल. भरपूर सुकामेवा आणि तूप घालून तिळाचे लाडू, तिळाची चिक्की असं काही घरात करून ठेवा. मुलं येताजाता असे गोड पदार्थ नक्की संपवतील. नाचणी हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. नाचणीच्या इडल्या, नाचणीचे डोसे मुलांसकट घरातल्या सगळ्याच मंडळींना आवडतील. पालक, ब्रोकोली यामध्ये कॅल्शियम असतं. या दोन्ही पदार्थांचं एकत्रित सूप मुलांना करून द्या. चवदार सूप सगळेच आवडीने पितात. टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्सWeight Loss TipsfoodHealth Tips