बदाम-पनीर परवडत नाही, शेंगदाणेही महाग? कॅल्शियमसाठी खा ‘हे’ ५ पदार्थ, ताकद वाढेल-पैसेही वाचतील खूप By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 12:41 PM 2024-11-07T12:41:12+5:30 2024-11-07T16:46:03+5:30
Foods That Have More Calcium Rather Than Milk : भेंडी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. कॅल्शियम (Calcium) फक्त हाडांना मजबूत बनवत नाही तर हाडं निरोगी ठेवण्यातही कॅल्शियमची महत्वाची भूमिका असते. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थच्या रिपोर्टनुसा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करू शकता. (5 Foods That Have More Calcium Rather Than Milk And Paneer)
चिया सिड्स चिया सिड्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यात ओमेगा-३ फॅटी एसिड्स आणि प्रोटीन्स असतात. या छोट्या बीया एंटी ऑक्सिडेंट्स, फायबर्स आणि इतर पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात. जे आरोग्याला बरेच फायदे देतात. चिया सिड्स ओट्स, स्मूदीमध्ये घालून तुम्ही पिऊ शकता. ( Highest Calcium Foods)
टोफू टोफू सोया मिल्कपासून तयार करण्यात आलेला एक पदार्थ आहे. यात कॅल्शियम सल्फेटचा वापर केला जातो. USDA फूड कंपोझिशन डेटाबेसनुसार यात जवळपास 680 ग्राम कॅल्शियम असते. टोफूचे सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं करू शकता.
चवळी चवळी शरीरासाठी अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. यात प्रोटीन्स, फायबर्स आणि आवश्यक खनिद पदार्थ असतात. चवळी हाडांना भरपूर कॅल्शियम देते. याच्या सेवनानं ऑस्टिओपॅरोसिसचा धोका कमी होतो.
ब्रोकोली ब्रोकोली कॅल्शियमचा एक उत्तम स्त्रोत आहे. ब्रोकोलीच्या सेवनानं पोषक तत्वांची कमतरता दूर करण्यास मदत होते.
ब्रोकोलीत प्रोटीनसुद्धा भरपूर असते जे तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. ब्रोकोलीची भाजी, सूप किंवा स्मूदीच्या स्वरूपात तुम्ही ब्रोकोली खाऊ शकता.
भेंडी भेंडी कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत आहे. जे मजबूत हाडांसाठी फायदेशीर ठरते, हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो. या भाजीचे सेवन केल्यानं हार्ट हेल्थ चांगली राहते.