5 Morning activities for improving concentration of kids, how to boost intelligence in kids
सकाळी मुलांकडून ५ गोष्टी करून घ्या, त्यांची बुद्धी होईल तल्लख आणि अभ्यासात होतील हुशार.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 04:40 PM2024-04-27T16:40:50+5:302024-04-27T16:54:20+5:30Join usJoin usNext सकाळच्यावेळी मुलांचा मेंदू अधिक जागरुक किंवा सतर्क असते. मन आणि शरीर दोन्ही फ्रेश असतं. त्यामुळे जर काही गोष्टी मुलांकडून सकाळच्यावेळी आवर्जून करून घेतल्या तर त्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर तसेच बौद्धिक विकासावर खूप चांगला परिणाम होतो. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा आणि आलटून पालटून त्या मुलांकडून करून घ्या. याचा मुलांच्या अभ्यासावर, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर नक्कीच खूप चांगला परिणाम दिसून येईल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळच्यावेळी मुलांना नेहमी पोटभर आणि पौष्टिक नाश्ता द्या. त्यातून त्यांना ओमेगा ३ फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन्स, लाेह आणि प्रोटीन्स मिळतील याची काळजी घ्या. मुलांना सकाळच्यावेळी अभ्यास करायला किंवा वाचन करायला लावा. यावेळी मन चटकन एकाग्र होते आणि वाचलेले लवकर लक्षात राहाते. सकाळी मुलांनी मोकळ्या हवेत जाऊन कोवळ्या सुर्यप्रकाशात काही शारिरीक व्यायाम केले पाहिजेत. यातून त्यांचे आरोग्य, मेंदू आणि मन अधिक तल्लख राहण्यास मदत होते. सकाळच्या वेळी मुलांना शास्त्रीय, सुगम यापैकी एखादं शांत संगीत ऐकवा. किंवा सकाळच्या वेळी असे संगीत घरात लावून ठेवा. संगीताचाही मुलांच्या बौद्धिक विकासावर, एकाग्रतेवर खूप चांगला परिणाम होतो. मुलांच्या बौद्धिक विकासासाठी मदत करणारे अनेक खेळ बाजारात मिळतात. यापैकी तुमच्या मुलांच्या वयानुसार खेळ आणा आणि ते मुलांना सकाळच्या वेळी खेळायला लावा. दिवसभरात कधीही खेळण्यापेक्षा सकाळच्या वेळी हे खेळ खेळल्याने अधिक फायदा होतो. टॅग्स :पालकत्वलहान मुलंParenting Tipskids