कबुतरांच्या त्रासाने वैतागलात? बाल्कनीत ५ रोपं लावा, कबुतरांना कायमचं दूर पळवणारा हिरवागार उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 11:21 AM2024-04-15T11:21:18+5:302024-04-15T11:28:31+5:30

कबुतर हा पक्षी आता अनेक जणांच्या डोक्याला ताप झाला आहे. कारण बाल्कनीमध्ये, खिडक्यांच्या वर, टेरेसमध्ये हे पक्षी त्यांचं बस्तान बसवतात. त्यानंतर मग दर २- ३ महिन्यांनी अंडी घालतात. त्यांची विष्ठा, घाण, कचरा साफ करताना मग अक्षरश: नाकीनऊ येतात.

तुम्हीही कबुतरांच्या या त्रासाने वैतागला असाल तर कबुतरं जिथे येऊन बसतात, त्या जागेवर या काही रोपांच्या कुंड्या ठेवा. यामुळे तुमची बाल्कनी, खिडकी तर हिरवीगार होईलच, पण कबुतरांचा त्रासही कायमचा जाईल.

यापैकी सगळ्यात पहिलं रोप आहे झेंडू. ज्या ठिकाणी झेंडूची रोपं असतात, त्या ठिकाणी कबुतरं येऊन बसत नाहीत.

दुसरं रोप आहे पुदिन्याचं. पुदिन्याच्या वासाने कबुतरं तुमच्या बाल्कनीत, खिडकीत फिरकणारही नाहीत.

तिसरं रोप आहे लसूण. लसूण पाकळ्यांच्या किंवा लसणाच्या पातीच्या उग वासामुळे कबुतरं त्या ठिकाणाहून त्यांचं बस्तान कायमचं हलवतील.

सिट्रोनेला हे रोप कबुतरांना दूर पळविणारं रोप म्हणून ओळखलं जातं. कबुतरांचा त्रास कायमचा घालविण्यासाठी एकदा हे रोप लावण्याचा प्रयत्न करून पाहा.

कॅक्टस प्रकारात येणारे कोणतेही रोप तुम्ही बाल्कनीत ठेवून पाहा. कबुतरं या रोपांमुळे दूर पळून जातात.