किचनमध्ये ठेवा पॉझिटीव्ह एनर्जी देणारी ५ रोपं.. स्वयंपाक करताना मन राहील प्रसन्न- फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2024 12:57 PM2024-02-23T12:57:04+5:302024-02-23T13:13:31+5:30

आपल्या घराभोवती कुंड्यांमध्ये ठेवलेली लहान झाडं असतील, तरी त्यांना पाहून मन प्रसन्न होऊन जातं. दिवसभराची मरगळ, थकवा असं सगळं आपण विसरून जातो.

स्वयंपाक करतानाही आपण तसंच आनंदी, उत्साही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटीव्ह असणं गरजेचं असतं. कारण सगळ्या घराचं आरोग्य आपल्या स्वयंपाकातूनच तर जपलं जातं.

म्हणूनच स्वयंपाक घरात ही काही रोपं ठेवा. या रोपांना लकी प्लांट्स किंवा पॉझिटीव्ह एनर्जी देऊन मन फ्रेश करणारी रोपं म्हणून ओळखलं जातं. ती नेमकी कोणती ते पाहूया...

सगळ्यात पहिलं आहे ते झेड प्लांट. घरात पॉझिटीव्ह वाईब्ज तयार करणारं झाड म्हणून झेट प्लांट ओळखलं जातं.

बांबू प्लांट देखील हल्ली अनेकांच्या हॉलमध्ये किचनमध्ये दिसतं. हे छोटंसं झाड तुमच्या स्वयंपाक घराच्या खिडकीजवळ ठेवा. त्याच्याकडे नुसतं पाहूनही छान वाटेल.

मनी प्लांट हे अनेकांच्या आवडीचं. अगदी ऊन- सावली कुठेही वाढणारं हे झाड तुमच्या स्वयंपाक घरात ठेवलं तर स्वयंपाक घराची शोभा नक्कीच वाढवेल.

स्नेक प्लांटदेखील सर्वोत्तम इनडोअर प्लांट्सपैकी एक मानलं जातं. हे रोपं अधिकाधिक प्रमाणात ऑक्सिजन सोडतं, तसेच आजुबाजुचे दुषित वायू, दुर्गंध शोषून घेण्यात मदत करतं.

पाचवं रोप आहे स्पायडर प्लान्ट. कोणतीही विशेष काळजी न घेता हे रोप भराभर वाढत जातं. थोडंसं ऊन आणि थोडंसं पाणी मिळालं तरी हे रोपटं भरभरून वाढतं. ते ज्या पद्धतीने छान फुलून येतं, ते पाहूनच एकदम उत्साही, आनंदी वाटतं.