5 protein rich food for vegetarian people, best 5 sources of proteins
भरपूर प्रोटीन्स देणारे ५ शाकाहारी पदार्थ, विकतचे प्रोटीन शेक पिण्यापेक्षा हे पदार्थ खा.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2024 03:55 PM2024-07-19T15:55:57+5:302024-07-19T17:25:55+5:30Join usJoin usNext शाकाहारी लोकांच्या आहारात नेहमीच प्रोटीन्सची कमतरता असते. यात महिलांचे प्रमाण तर जास्त आहे. त्यामुळेच त्यांनी आहारात असे काही पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत, ज्यातून त्यांना पुरेशा प्रमाणात प्रोटिन्स मिळतील. असे भरभरून प्रोटीन्स देणारे पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये सांगितलेले पदार्थ तुमच्या आहारात घ्या. जेणेकरून विकतचे प्रोटीन शेक घेण्याची गरज पडणार नाही, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. भरपूर प्रोटीन्स देणाऱ्या पदार्थांपैकी पहिला पदार्थ आहे सातूचे पीठ. यातून प्रोटीन्स, अमिनो ॲसिड तसेच योग्य प्रमाणात फायबर मिळतात. योग्य प्रमाणात प्रोटीन्स मिळण्यासाठी दररोज मुठभर पिस्ते खा असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला. डाळी आणि मसूर यांच्यामध्येही पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स असते. त्यांचा पुरेपूर फायदा शरीराला तेव्हाच होतो, जेव्हा तुम्ही तांदूळ किंवा इतर धान्यांसोबत ते खाता. झटपट प्रोटीन्स मिळविण्याचा एक स्त्रोत आहे ग्रीक योगर्ट. १०० ग्रॅम ग्रीक योगर्टमधून ९ ते १० ग्रॅम प्रोटीन्स मिळतात. राजगिऱ्यामधूनही भरपूर प्रोटीन्स मिळते. तो जेव्हा इतर धान्यांसोबत, डाळींसोबत तुम्ही मिक्स करता, तेव्हा त्यातले प्रोटीन्स अधिक पोषक ठरतात. टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्सWeight Loss TipsfoodHealth Tips