5 Rules to control sugar and weight, How to control weight and blood sugar level
शुगर आणि वजन दोन्ही राहील कंट्रोलमध्ये! काहीही खाताना- पिताना फक्त 'या' ५ गोष्टी लक्षात ठेवा.... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2023 09:21 AM2023-11-17T09:21:30+5:302023-11-17T09:25:02+5:30Join usJoin usNext काही जणांना शुगर नसते. पण भविष्यात आपल्याला डायबिटीज किंवा मधुमेह होऊ नये म्हणून ते काळजी घेत असतात. किंवा वजन वाढू नये म्हणून गोड खाण्यावर कंट्रोल करत असतात. काही जणांना मात्र वजन आणि शुगर दोन्ही वाढू नये म्हणून खाण्यापिण्यावर कंट्रोल करता येत नाही. गोड पदार्थ समोर आले की मोह आवरत नाही. अशावेळी नेमकं काय करावं आणि वजन आणि शुगर या दोन्ही गोष्टी वाढू नयेत, म्हणून कसे प्रयत्न करावे, याविषयीची माहिती डॉ. दक्षता पाध्ये यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिली आहे. त्यापैकी त्यांनी सांगितलेला पहिला नियम म्हणजे सोडा, आर्टिफिशियल फ्लेवर असलेले ज्यूस असं काहीही पिऊ नये. त्याऐवजी ब्लॅक कॉफी, नारळपाणी, ताक, हर्बल टी, फळांच्या स्मूदी असे पौष्टिक पिण्यावर भर द्यावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पाणी भरपूर प्यावे. दुसरे म्हणजे वेगवेगळे सॉस, व्हिनेगर, केचअप, विकतचे मसाले, सिझनिंग्स, लोणची हे पदार्थ कमीतकमी खावे. कारण त्यामध्ये खूप जास्त मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात. गोड खावंसं वाटलं तर कोका डार्क चॉकलेट, बेक फ्रुट विथ क्रिम किंवा दालचिनी, अक्रोड असं टाकून केलेले योगर्ट हे पदार्थ खा. कोणतेही विकतचे किंवा पॅकिंगचे पदार्थ खाण्याआधी त्याच्या इंग्रेडियंट्सचं नाव वाचा. sucrose, maltose, dextrose, fructose, glucose, lactose असे घटक असणारे पदार्थ खाऊ नका. प्रोटिन्स आणि फायबरयुक्त पदार्थ आहारात अधिकाधिक असावेत. यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते आणि वारंवार भूक लागत नाही. टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नमधुमेहहेल्थ टिप्सWeight Loss TipsfooddiabetesHealth Tips