5 simple changes in your lifestyle or routine work that will help you for fast weight loss
रोजच्या कामात ५ सोपे बदल करा, महिनाभरातच वजन झटपट कमी होईल- व्हाल एकदम फिट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 12:28 PM2024-08-26T12:28:10+5:302024-08-26T12:33:57+5:30Join usJoin usNext वाढत्या वजनाची चिंता तुम्हालाही भेडसावत असेल तर रोजच्या कामात ५ साधे- सोपे बदल करा. यामुळे वजन कमी होण्यास निश्चितच मदत होईल. एवढंच नाही तर तुम्ही खूप ॲक्टीव्ह आणि फिटदेखील व्हाल. (5 simple changes in your lifestyle or routine work that will help you for fast weight loss) अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन यांच्या अभ्यासानुसार तुमच्या आहारात जर प्रोटीन योग्य प्रमाणात असतील तर त्याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. कारण प्रोटीन पोटात योग्य प्रमाणात गेल्यास अधिक काळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे आपोआपच मग जास्तीचं खाणं बंद होतं. Intermittent fasting या प्रकारचं डाएट केल्यामुळेही बऱ्याच प्रमाणात वजन कमी होण्यास मदत होते. कारण त्यामुळे जास्तीच्या खाण्यावर आपोआप नियंत्रण येतं आणि त्यामुळे कमीतकमी कॅलरी पोटात जातात. Annals of Internal Medicine यांच्या अभ्यासानुसार दररोज ७ ते ८ तासांची झोप घेतलीच पाहिजे. यामुळे शरीराला आराम मिळतो तसेच हार्मोन्स नियंत्रित राहण्यास मदत होते. जे लोक रात्रीची झोप पूर्ण घेत नाहीत, रात्री उशिरा झोपतात, त्यांच्या शरीरावरील फॅट्सचे प्रमाण वाढत जाते, असेही अभ्यासावरून लक्षात आले आहे. तुमच्याकडे व्यायाम करायला पुरेसा वेळ नसेल तर १५ ते २० मिनिटेच व्यायाम करा. पण तो अतिशय जलद प्रकारातला करा. यामुळे कमीतकमी वेळात जास्तीतजास्त शारिरीक हालचाली होऊन अतिरिक्त चरबी, कॅलरी कमी होतात. आहारातलं साखरेचं आणि मैद्याच्या पदार्थाचं प्रमाण पुर्णपणे बंद करा. यामुळे वजनात खूप लवकर कमी होईल.टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३व्यायामWeight Loss TipsHealthHealth TipsfoodFasting & FoodExercise