5 SYMPTOMS THAT SHOWS YOU ARE NOY DRINKING SUFFICIENT WATER, WHAT HAPPEND IF WE DRINK LESS WATER?
तुम्ही पाणी कमी पित आहात हे सांगणारी ५ लक्षणं, बघा तुम्हालाही असा त्रास होतोय का? By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2023 09:15 AM2023-10-01T09:15:19+5:302023-10-01T09:20:01+5:30Join usJoin usNext दररोज पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे, हे प्रत्येकालाच माहिती आहे. पण प्रत्यक्षात बऱ्याच जणांकडून तसं होत नाही. पाणी खूप कमी प्रमाणात प्यायला जातं. त्याची वेगवेगळे लक्षणं आपलं शरीर वेळोवेळी दाखवतं. पण आपल्या ते लक्षात येत नाही. म्हणूनच ही काही लक्षणं पाहा. तुम्हालाही असा त्रास जाणवत असेल तर एकदा तुम्ही पुरेसं पाणी पित आहात की नाही हे तपासून घ्या... पाणी पुरेशा प्रमाणात प्यायलं जात नसेल तर त्याचं सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे त्वचा कोरडी आणि निस्तेज होणं... पाणी योग्य प्रमाणत प्यायलं नाही तर ओठं कोरडे पडतात. ओठांची सालटं निघू लागतात. लघवीचा रंग पिवळट असेल तर तुम्ही पाणी कमी प्रमाणात पित आहात. तोंडातून कायम दुर्गंध येत असेल तरी त्याचं एक कारण पाणी पिण्याचं प्रमाण कमी असणं हे आहे. सतत डोकेदुखी होत असेल तरी एकदा पाणी योग्य प्रमाणात प्यायलं जातं की नाही हे तपासून पाहा.टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सपाणीHealthHealth TipsWater