स्वत:चा कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी ५ गोष्टी करा, चारचौघांसमोर बोलण्याची भीती निघून जाईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 02:16 PM2024-09-21T14:16:20+5:302024-09-21T14:22:40+5:30

काही जणांना सगळं येत असतं. बरंच काही माहिती असतं. पण चारचौघांसमोर ते मांडता येत नाही. व्यक्त होता येत नाही. यामुळे मग करिअरमधल्या अनेक संधी हुकतात (easy tips to boost your confidence). तुमचंही तसंच होत असेल तर स्वत:चा कॉन्फिडन्स वाढविण्यासाठी या काही साध्यासोप्या गोष्टी करून पाहा...(5 tips to increase your confidence)

हळूहळू लोकांसमोर बोलण्याची सवय करा. तुमच्या मनात जे काही आहे ते स्पष्ट बोलायला लागा. तुमच्या घरातले लोक, जवळचे मित्रमैत्रिणी, मुलं यांच्यासमोर अगदी मोकळं बोला. यातून हळूहळू बोलण्याचा, स्वत:चे विचार मांडण्याचा सराव होईल.(5 tips to increase your confidence)

तुम्ही उत्तम ड्रेसिंग केलेलं असेल तर आपोआपच तुमचा आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे तुम्ही ज्या कपड्यांमध्ये आरामदायी असाल असेच कपडे घाला, आपल्या स्वत:ला कधी कधी असं वाटत असतं की अमूक प्रकारच्या कपड्यांमध्ये आपण जास्त आकर्षक दिसतो. असेच कपडे निवडा. यामुळे तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढण्यासाठी नक्कीच मदत होईल

नियमितपणे थोडा व्यायाम करा किंवा सकाळच्या प्रसन्न फ्रेश वातावरणात एकट्यानेच फिरायला जा. यावेळी तुम्हाला जो स्वत:चा वेळ मिळेल त्या वेळेत तुमच्याकडच्या पॉझिटीव्ह गोष्टींची उजळणी करा. यामुळे कॉन्फिडन्स वाढायला नक्कीच मदत होते. अख्खा दिवस पुरेल एवढी पॉझिटीव्ह एनर्जी मिळते.

लहान- सहान गोष्टींमध्ये जरी तुम्ही यशस्वी झालात, तरी ते क्षणही सेलिब्रेट करा. यामुळे उत्साह वाढतो, आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. शिवाय आपणही यश मिळवू शकतो, असा आत्मविश्वास वाढत जातो.

मनातले निगेटीव्ह विचार कमी करा. यासाठी उत्साही, आनंदी आणि सकारात्मक वृत्तीच्या लोकांसोबत राहा. सकारात्मक गोष्टी बघा, वाचा...