रोजच्या स्वयंपाकासाठी 'हे' तेल मुळीच वापरू नका! पाहा आरोग्यासाठी धोकादायक असणारे तेलाचे प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2024 03:43 PM2024-09-18T15:43:02+5:302024-09-18T15:52:42+5:30

रोजच्या स्वयंपाकासाठी तुम्ही कोणतं तेल वापरता यावर तुमचं आणि कुटूंबातल्या इतर सदस्यांचं आरोग्य खूप जास्त प्रमाणात अवलंबून आहे.

मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी याविषयीचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यामध्ये त्यांनी स्वयंपाकासाठी कोणते तेल मुळीच वापरू नये हे सांगितले आहे. त्या म्हणतात की स्वयंपाकासाठी ५ प्रकारचे तेल वापरणं तुम्ही पुर्णपणे टाळलं पाहिजे.

त्यापैकी पहिलं आहे पाम ऑईल. स्ट्रीटफूडमध्ये हे तेल सगळ्यात जास्त वापरलं जातं. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते. त्यामुळे ते हृदयासाठी हानिकारक ठरतं.

दुसरे आहे व्हेजिटेबल ऑईल आणि त्यात मिळणारे पाम, कॉर्न, पमोला असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लेंड ऑईल. ते खूप जास्त प्रोसेस्ड आणि रिफाईंड असतात. त्यांच्यामध्ये ओमेगा ६ फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप जास्त असते. ते अंगावर सूज येण्याचा त्रास होतो.

कॉर्न ऑईलमध्ये हृदयासाठी हानिकारक ठरणाऱ्या पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप जास्त असते.

सनफ्लॉवर ऑईलचा अतिरेकही आरोग्यासाठी चांगला नाही. त्यामध्ये ओमेगा ६ फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे आरोग्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास होऊ शकतो.

पाचवे तेल आहे राईस ब्रॅन ऑईल. त्याच्यामध्येही ओमेगा ६ फॅटी ॲसिडचे प्रमाण खूप जास्त असते. हे तेल खूप जास्त प्रोसेस करून तयार केले जाते. त्यासाठी हेक्झेन नावाचा एक घटक वापरला जातो. तो अतिप्रमाणात पोटात जाणे आरोग्यासाठी त्रासदायक आहे.