मुलांची उंची वाढत नाही म्हणून चिंता वाटतेय? ५ योगासनं दररोज करायला लावा, उंची वाढायला होईल मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2023 09:10 AM2023-09-08T09:10:32+5:302023-09-08T11:30:16+5:30

आपल्या व्यक्तिमत्वाची छाप समाेरच्या व्यक्तीवर पाडायची असेल, तर त्यात आपल्या उंचीची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. त्यामुळे आपल्या मुलांची उंची खूप जास्त नसली तरी ते ठेंगणे असू नयेत, अशी पालकांची अपेक्षा असते.

म्हणूनच मुलांची उंची वाढत नसेल, तर त्यांच्या पालकांना चिंता वाटू लागते. तुमच्याही मुलांची उंची कमी असेल, तर त्यांना पुढील काही योगासने नियमितपणे करायला लावा. उंची वाढण्यास निश्चितच मदत होईल.

सगळ्यात पहिलं आसन म्हणजे ताडासन. दोन्ही हात वर करून पायाच्या टाचाही उचलाव्या आणि पायाच्या बोटांवर शरीराचा तोल सावरण्याचा प्रयत्न करावा.

दुसरं आसन म्हणजे चक्रासन. चक्रासन केल्याने पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो आणि उंची वाढण्यास मदत होते, असे मानले जाते.

तिसरं आसन आहे बालासन. बालासन नियमितपणे केल्यास मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते.

चौथे आसन आहे श्वानासन. श्वानासन केल्याने मुलांची उंची तर वाढतेच पण एकाग्रता वाढण्यासाठीही मदत हो

पाचवे आसन आहे धनुरासन. बऱ्याच मुलांची पोट दुखतं म्हणून सतत तक्रार असते. धनुरासन केल्याने पाेटदुखीही कमी होते तसेच उंची वाढण्यासही मदत होते.