डाएट- व्यायाम नेहमी करूनही वजन अचानकच वाढायला लागतं? त्याची ६ कारणं, बघा 'असे' होते का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2023 03:36 PM2023-10-23T15:36:02+5:302023-10-23T15:43:25+5:30

अनेक जणांच्या बाबतीत असं होतं की आपला आहार, व्यायाम किंवा इतर रुटीन नेहमीप्रमाणेच सुरू असतं. पण तरीही वजन अचानकच खूप वाढू लागतं. असं तुमच्याही बाबतीत झालं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण पुढे सांगितलेल्या ७ गोष्टींमुळे तुमचं वजन वाढू शकतं.

१. यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे PCOS. हा शरीरातला एक हार्मोनल बदल असून अलिकडे हा त्रास खूप वाढला आहे. या आजारात मुख्यत: शरीराच्या इन्सुलिन तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. शिवाय शरीरातील फॅट स्टोरेज वाढते. त्यामुळे लठ्ठपणा येऊ लागतो.

२. अचानक वजन वाढण्याचं एक कारण आहे स्ट्रेस. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा खूप ताण घेतला तर तुमच्या शरीरात cortisol हा हार्मोन तयार होतो. त्याला स्ट्रेस हार्मोन असंही म्हणतात. या हार्मोनमुळे तुमची भूक वाढते आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा होते. तसेच पचन क्रियेवर परिणाम होत जातो.

३. हायपोथायरॉईडिझम असेल तर शरीरात थायरॉईड ग्रंथी पुरेसं थायरॉईड तयार करू शकत नाही. त्यामुळेही वजन झपाट्याने वाढू लागतं.

४. मेनोपॉज जवळ आला असेल तरीही वजन खूप वाढतं. कारण त्यामुळे शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते आणि त्याचा परिणाम वजन वाढीवर दिसून येतो.

५. शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल, वारंवार जागरण होत असेल तर त्यामुळेही वजन वाढू शकतं.

६. काही आजारांमुळे सतत औषधी घ्यावी लागत असतील तर त्यामुळे वजन अचानक वाढतं.