वजन भराभर कमी करायचंय? मग 'ही' फळं आतापासूनच दररोज खा, झर्रकन उतरेल वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 09:12 AM2023-12-16T09:12:28+5:302023-12-18T15:25:59+5:30

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर आता हा एक उपाय करून पाहा.. वजनाचा काटा भराभर खाली येण्यासाठी हा उपाय नक्कीच तुम्हाला मदत करेल.

वजन कमी करायचं असेल तर आहारात अधिकाधिक फायबरयुक्त पदार्थ असणं गरजेचं आहे. कारण या पदार्थांमुळे चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलीझम क्रिया अधिक वेगवान होते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं चांगलं पचन होतं.

फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने बराच काळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग वारंवार काही खाण्याची इच्छा होत नाही आणि आपोआपच वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी कोणती फळं खावी ते आता पाहूया..

यातलं पहिलं फळं आहे अव्हाकॅडो. १ कप अव्हाकॅडो खाल्ल्यास १० ग्रॅम फायबर मिळतात.

रासबेरी आणि ब्लॅकबेरीमध्येही भरपूर फायबर असतं. ही दोन्ही फळं तुम्ही साधारण १ कप एवढी खाल्ली तर त्यातून ८ ग्रॅम फायबर मिळते.

पॅशन फ्रुटमधून सगळ्यात जास्त फायबर मिळते. १ कप जर हे फळ खाल्ले तर त्यातून जवळपास २४ ग्रॅम फायबर मिळेल.

पेरूदेखील फायबरचा चांगला स्त्रोत आहे. साधारणपणे १ मध्यम आकाराचा पेरू खाल्ल्यास त्यातून ९ ग्रॅम फायबर मिळते.

डाळिंबामधूनही चांगल्या प्रकारे फायबर मिळू शकते.

तसेच पेर हे फळही फायबर रिच फ्रुट म्हणून ओळखले जाते.