हिमोग्लोबिन नेहमीच कमी असतं? ६ फळं नियमित खा- अशक्तपणा कमी होऊन रक्तातील लाेह वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2024 02:56 PM2024-02-12T14:56:24+5:302024-02-12T15:02:37+5:30

हिमोग्लोबिन कमी असण्याचं प्रमाण अनेकांमध्ये आहे. विशेषकरून बहुसंख्य महिलांमध्ये ही समस्या जाणवते. रक्तातील लोहाचं प्रमाण कमी झालं की अशक्तपणा जाणवू लागतो. यालाच आपण ॲनिमिया असंही म्हणतो.

रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवायचं असेल तर आहारात काही फळं आवर्जून घ्यायलाच पाहिजेत. या फळांमुळे हिमोग्लोबिन वाढून अशक्तपणा किंवा ॲनिमिया कमी व्हायला नक्कीच मदत होते.

यामध्ये सगळ्यात पहिले आहे सफरचंद. सफरचंदामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी हे दोन्ही घटक असतात. त्यामुळे रक्तामध्ये लोह शोषून घेण्याचे प्रमाण वाढते.

किवीमध्येही व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे इतर पदार्थांमधून जे लोह मिळते, ते शोषून घेण्याची शरीराची क्षमता वाढते.

पेरू खाल्ल्याने देखील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. कारण त्यातूनही लोह तसेच व्हिटॅमिन सी दोन्ही भरपूर प्रमाणात मिळते.

डाळिंब हा देखील अशक्तपणा कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. १०० ग्रॅम डाळिंबामधून ०. ३१ एमजी लोह मिळते.

केळीमधूनही लोह मिळते. तसेच व्हिटॅमिन बी ६ चा उत्तम स्त्रोत म्हणूनही केळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

स्ट्रॉबेरी किंवा अन्य बेरी प्रकारांतील फळांमधून व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे शरीराची रक्तात लोह शोषून घेण्याची क्षमता वाढत जाते.