फार काळजी न घेताही झटपट वाढणारी ६ रोपं, बघा काही दिवसांतच बाग हिरवीगार करण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2024 06:00 PM2024-07-18T18:00:00+5:302024-07-18T18:08:37+5:30

बागेत रोपं लावण्याची भारीच हौस आहे, पण रोपांची काळजी घेण्यासाठी, त्यांना वेळोवेळी खत पाणी देण्यासाठी पुरेसा वेळच नाही, ही अनेकांची समस्या असते. तुमचीही हीच अडचण असेल तर तुम्ही विचारपुर्वक तुमची बाग सजवली पाहिजे.

त्यासाठी तुम्ही अशी काही रोपं निवडली पाहिजेत ज्यांच्याकडे खूप काही लक्ष देण्याची गरज नसते. शिवाय ती रोपं नेहमीच हिरवीगार आणि टवटवीत दिसतात. त्यामुळे तुमची बाग कायम बहरलेली वाटते. अशी राेपं नेमकी कोणती ते पाहा...

यातलं सगळ्यात पहिलं तर आहे स्पायडर प्लांट. हे तुम्ही इनडोअर तसेच आऊट डोअर म्हणूनही वापरू शकता.

दुसरं रोप आहे फॉक्स टेल. या रोपाला फक्त ३ ते ४ तास ऊन येईल अशा जागी ठेवा. बाकी त्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.

यानंतर तुम्हाला ऑफिस टाईमचं रोपही लावता येईल. या रोपाला ऊन मिळेल अशा जागी ठेवा. त्याच्यावर कायम उमलणारी रंगबेरंगी फुलं पाहताक्षणीच तुम्ही प्रसन्न होऊन जाल.

चिनी गुलाब या रोपाचीही खूप काळजी घ्यावी लागत नाही. त्यावरही नेहमीच रंगबेरंगी फुलं उमलतातात.

यानंतर तुम्ही अरेका पामही लावू शकता. हे रोपाचाही इनडोअर आऊट डोअर असा दोन्ही उपयोग करता येतो.

बागेकडे खूप लक्ष द्यायला वेळ नसेल तर स्नेक प्लांटचाही विचार नक्की करा. तुमच्याकडच्या जागेच्या हिशोबाने तुम्ही त्यातली उंच किंवा अखूड व्हरायटी निवडू शकता.